ETV Bharat / state

कोरोना काळात लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा - राज्यमंत्री अब्दुल सत्तार - Manrega scheme

रोजगार हमी योजनेतून गावागावात कामे सुरू करण्या संदर्भात सिल्लोड येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री सत्तार यांनी कोरोना संदर्भात सूचना दिल्या.

लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा

author img

By

Published : May 9, 2021, 10:38 AM IST

सिल्लोड - गाव पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना काळात गावातील कुशल व अकुशल कामगारांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी प्रभावी उपाययोजना करा, असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेला दिले. रोजगार हमी योजनेतून गावागावात कामे सुरू करण्या संदर्भात सिल्लोड येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री सत्तार यांनी कोरोना संदर्भात सूचना दिल्या.

या बैठकीस रोजगार हमी मंत्री ना. संदीपान भुमरे यांचे खासगी सचिव अशोक शिरसे , उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य , युवानेते अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर वाघेकर, तहसीलदार विक्रम राजपूत, डॉ. संजय जामकर,पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता के.बी. मराठे, जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता कल्याण भोसले आदिंची उपस्थिती होती.

शाळा मध्ये विलगिकरण कक्ष स्थापा-

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील नागरिकांची टेस्टिंग करून घ्यावी जर रुग्ण बाधित आढळला किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांसाठी गावातील शाळेतच अलगिकरण / विलगिकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक डॉक्टरांची मदत घेण्यात यावी,

रोजगाराची कामे तत्काळ सुरू करा

कोरोनासारख्या संकट काळात लोकांच्या हाताला काम देणेही सरकारची भूमिका आहे. यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करून शासनाच्या निकषानुसार व नियमांच्या अधीन राहून लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात यावे , कामांचा आराखडा व प्रत्यक्ष कामे करीत असतांना स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन काम करावे, सामूहिक व वयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यन्त पोहचविण्यासाठी नियोजन करा आशा सूचना देत यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीस स्पष्ट केले.

विकास कामांतून तालुक्याचा चेहरा बदलणार

शासनाच्या नवीन निकष व धोरणानुसार रोजगार हमी योजनेला विकासाची जोड देण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून तालुक्यातील गावांचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाच्या संकटात हाताला काम आणि यातून गावाचा विकास अशी ही योजना असल्याने नागरिकांनी या योजनेत सहभागी होवून शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

पावसाळा सुरू होण्यास अद्याप एक महिना वेळ असल्याने रोजगार हमी योजनेतून गावातील गायरान जमिनीत सीसीटी, बांध बंदिस्ती, नाला बॅंडिंग, शिवरस्ते, वाडी रस्ते, पाणंद रस्ते इत्यादी कामे प्राधान्याने करणे, रोजगार हमी योजने सामूहिक आणि व वैयक्तिक कामे सुरू करणे, वन विभाग व कृषी विभाग यांनी समनव्यातुन वन क्षेत्रात व गायरान जमिनीवर वृक्ष लागवड व सिंचनाची कामे करणे, तुती लागवडीसाठी नियोजन करून शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी प्रवृत्त करणे, कृषी विभागाने फळबाग लागवडीचे उद्दिष्टे पूर्ण करणे, गावागावात गाईचा गोठासाठी पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, शेतकऱ्यांना शेळी पालन, दुग्ध व्यवसाय यासाठी प्रवृत्त करणे , वर्षभर लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे या पद्धतीने उपाययोजना करणे इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करण्यात येवून याची अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.