ETV Bharat / state

Imtiaz Jaleel On Political Crisis : ...म्हणून सत्तासंघर्षाच्या निकालाचे आश्चर्य वाटत नाही - एमआयएम खासदार जलील - MP Jalil Reaction

राज्यातील सत्ता संघर्षावर एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केले आहे. सत्ता संघर्षाच्या निकालाचे आश्चर्य वाटत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते आज संभाजीनगरमध्ये बोलत होते.

Verdict MP Jalil Reaction
Verdict MP Jalil Reaction
author img

By

Published : May 11, 2023, 7:08 PM IST

एमआयएम खासदार जलील यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : आजच्या सत्ता संघर्षाच्या निकालाचे आश्चर्य वाटत नाही अशी, टीका एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. ज्या प्रकारे यांचे मंत्री आणि आमदार यांना विश्वास होता, ज्या पद्धतीने ते बोलत होते. त्यावरून निकाल यांच्याबजूने लागणार हे माहीत होते. सर्व चूक झाले हे मान्य आहे, तर निर्णय का नाही असा आरोप देखील खा. जलील यांनी केला.

न्यायालय सर्व चूक असल्याचे निष्कर्ष नोंदवते, मात्र त्यावर निर्णय घेत नाही हे चुकीचे आहे - इम्तियाज जलील

अध्यक्ष विदेशात का गेले : न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय लागणार आहे हे माहीत होते. सर्वांचे लक्ष त्याकडे असताना विधानसभा अध्यक्ष विदेशात जातात म्हणजे हे सर्व पूर्वनियोजित आहे, असा आरोप खासदार जलील यांनी लावला. न्यायालय सर्व चूक असल्याचे निश्चित निष्कर्ष नोंदवते, मात्र त्यावर निर्णय घेत नाही हे चुकीचे आहे. आता सरकार तुमचीच असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा. नुसत्या बैठका घेऊन होणार नाही तर, आमच्याकडे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील खासदार जलील यांनी केली. भाजपकडे सर्व आहे तोपर्यंत काहीही होणार नाही, जोपर्यंत त्यांना सत्ता हवी आहे. तोपर्यंत ते सत्ता सोडणार नाही, अशी टीका देखील खासदार जलील यांनी केली.

भुमरे यांनी केली टीका : अनिल परब काय बोलतात यापेक्षा पोट काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. न्यायालयाने आम्हाला दिलासा दिल्याने नैतिक तिचा विषय येतो कुठे, कोर्टापेक्षा कोणीही मोठा नाही, अशी टीका पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केली. आता इतर आमदारांनीही आमच्याकडे यावे आमचे भविष्य चांगले आणि उज्वल आहे. राहिलेले लोक देखील अस्वस्थ असतील. याच्याकडे कोणी राहिलेले नाही. आता सरकार टिकेल कारण आम्हाला न्यायालयाने दिलासा दिला आहे, अस मत जिल्ह्याचे पालकमंत्री भुमरे यांनी व्यक्त केले.

न्यायालयाने आम्हाला दिलासा दिल्याने नैतिक तिचा विषय येतो कुठे - संदिपान भुमरे, पालकमंत्री संभाजीनगर

विधान सभा निवडणुकीपर्यंत सत्तेत : न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे महायुती सरकारला दिलासा मिळाला आहे. पुढील विधानसभा निवडणूक येई पर्यंत शिंदे - फडणवीस यांची सत्ता राहील अस मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांसह निवडणूक आयोगाला फटकारले, शिंदे-फडणवीस सरकार वाचले!
  2. SC on Governor Floor Test Call : राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बोलावण्याचा निर्णय अवैध; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
  3. Cabinet expansion : सुप्रीम निरीक्षणानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा, बच्चू कडू संजय शिरसाटांसह इतरांच्या आशा पल्लवीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.