ETV Bharat / state

वंचित जागा वाटपाबाबत निर्णय घेत नसल्याने चिंता  - खासदार इम्तियाज जलील

author img

By

Published : Aug 20, 2019, 1:16 PM IST

जागा वाटपावरुन वंचितकडून अजून निर्णय येत नाही. त्यामुळे खूप उशीर झाला म्हणून आम्हाला काळजी वाटते. आमची पण जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. यापुढे एकेक दिवस महत्वाचा आहे. एकेक दिवस पुढे जातो तशी आमची काळजी वाढत जाते. आमचे एक प्रतिनिधी मंडळ बाळासाहेबांशी भेट घेणार असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले. तसेच मी स्वतः प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असून त्यांना विनंती करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

जलील

औरंगाबाद - आम्ही खूप फ्लेगजिबल आहोत. 76 वर म्हणजे 76 वर ठाम आहोत, असे काही नाही. बाळासाहेब आंबेडकर यांनी जर सांगितले की या जागा आम्ही नाही देऊ शकत, त्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र, वंचितच्या कोअर कमिटीकडून उत्तर मिळत नसल्याने आम्हाला आमचे नियोजन करणे अवघड होतं असल्याने लवकरच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना भेटणार असल्याचे एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले.

वंचित जागा वाटपाबाबत निर्णय घेत नसल्याने चिंता वाटते - खासदार इम्तियाज जलील

जेव्हा दिल्लीत मिटिंग झाली होती. त्यामध्ये ओवेसी, बाळासाहेब आंबेडकर आणि मी स्वतः होतो. त्या मिटिंगमध्ये निर्णय झाला होता. बाळासाहेब म्हणाले होते तुम्ही कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार आहात त्याची यादी द्या. त्यावेळी 98 जागांचा प्रस्ताव राज्यभरातील आमच्या जिल्हाध्यक्षांकडून आला होता. त्यात आम्ही सर्वेक्षण केले. त्यामध्ये 76 जागा अशा होत्या की ज्या ठिकाणी एमआयएमचे प्राबल्य आहे. 22 जागा अशा होत्या की ज्यामध्ये अधिक कष्ट करण्याची गरज होती आणि या सगळ्या जागांवर सर्व्हे केला. पुन्हा 22 पैकी 6 जागा आम्ही लढलो असतो. त्यामुळे आम्ही 76 जागांची यादी वंचित बहुजन आघाडीकडे पाठवली असल्याची माहिती जलील यांनी दिली.

बाळासाहेबांनी असे सांगितलं की वंचितच्या कमिटीसमोर बसून फायनल करा. आम्ही कमिटीसमोर बसलो आणि सांगितले, की आमची यादी फायनल करा. तुम्ही आम्हाला 10, 15, 20, 50, 100 यापैकी ज्या जागा देणार ते सांगा. कमीत कमी आम्ही आमचे काम सुरू करू, पण ती यादी आली नाही. म्हणून आम्ही रिमाईंडर म्हणून बाळासाहेबांना सांगितले की, ज्या जागांवर काही आक्षेप, समस्या नाही त्या जागा सांगा, त्या जागांवर आम्ही काम सुरु करू. पण असेही झाले नाही. लवकरात लवकर निर्णय कळवण्याची विनंती बाळासाहेब आंबेडकरांना केली असल्यचे जलील यांनी सांगितले.

जागा वाटपावरुन वंचितकडून अजून निर्णय येत नाही. त्यामुळे खूप उशीर झाला म्हणून आम्हाला काळजी वाटते. आमची पण जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. यापुढे एकेक दिवस महत्वाचा आहे. एकेक दिवस पुढे जातो तशी आमची काळजी वाढत जाते. आमचे एक प्रतिनिधी मंडळ बाळासाहेबांशी भेट घेणार असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले. तसेच मी स्वतः प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असून त्यांना विनंती करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. त्यामुळे वंचित आणि एमआयएमच्या जागावाटपाचा तिढा सुटातासुटेना असेच दिसून येत आहे.

Intro:आम्ही खूप फ्लेगजीबल आहोत. 76 वर म्हणजे 76 वर ठाम आहोत असं काही नाही. बाळासाहेब यांनी कधी सांगितले की या जागा आम्ही नाही देऊ शकत त्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र वंचितचा कोर कमिटी कडून उत्तर मिळत नसल्याने आम्हाला आमचं नियोजन करण अवघड होतं असल्याने लवकरच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना भेटणार असल्याचं एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितलं.Body:जेव्हा दिल्लीत मिटिंग झाली होती. त्यामध्ये असोउद्दीन ओवेसी, बाळासाहेब आंबेडकर आणि मी स्वतः होतो. त्या मिटिंग मध्ये निर्णय झाला होता. बाळासाहेब म्हणाले होते तुम्ही कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार आहात त्याची यादी द्या. त्यावेळी 98 जागांचा प्रस्ताव राज्यभरातील आमच्या जिल्हाध्यक्षांकडून आला होता. त्यात आम्ही सर्वेक्षण केले. त्यामध्ये 76 जागा अशा होत्या की ज्या ठिकाणी एमआयएमचं प्राबल्य आहे.22 जागा अशा होत्या की ज्यामध्ये अधिक कष्ट करण्याची गरज होती आणि या सगळ्या जागांवर सर्व्हे केला. पुन्हा 22 पैकी 6 जागा आम्ही लढलो असतो. त्यामुळे आम्ही 76 जागांची यादी वंचित बहुजन आघाडीकडे पाठवली.Conclusion:बाळासाहेबांनी असं सांगितलं की वंचितच्या कमिटीसमोर बसून फायनल करा. आम्ही कमिटीसमोर बसलो आणि सांगितलं की आमची यादी फायनल करा. तुम्ही आम्हाला 10,15,20,50,100 यापैकी ज्या जागा देणार ते सांगा. कमीत कमी आम्ही आमचं काम सुरू करू, पण ती यादी आली नाही. म्हणून आम्ही रिमाईंडर म्हणून बाळासाहेबांना सांगितलं की लवकरात लवकर आम्हाला सांगितलं की ज्या जागांवर काही आक्षेप, समस्या नाही त्या जागा सांगा त्या जागांवर आम्ही काम सुरु करू. पण असंही झालं नाही त्यामुळे आम्ही बाळासाहेबांना पुन्हा विनंती केली आहे लवकरात लवकर कळवावे. कारण ओवेसी हे विचारतायत की आपल्याला कुठे आणि कुणाची सभा घ्यायची आहे हे आम्हाला अंतिम करायचं आहे पण आम्हाला हे सध्या होत नाही, कारण आम्हाला अजून ते करता येत नाही कारण आम्हाला अजून कळालेलं जाही आम्ही किती सीटवर लढणार आणि किती जागांवर नाही. आपण ज्या जागा मागितल्या आहेत. काहीही सांगितलं नसल्याने आम्ही ओवेसी यांना सांगितले की तुम्ही बाळासाहेब यांच्याशी बोला. ज्या वेळेस आमची बैठक झाली त्याला 15 दिवस उलटलेले आहेत. त्यामधे आम्हाला सांगण्यात आलं होतं की आम्ही 3 दिवसांत यादी पाठवू. आता 15 दिवस उलटूनही आमच्याकडे यादी आली नाही.आम्ही मेल केलेला आहे.कमिटीला पत्र पाठवलेल आहे. खूप उशीर झाला म्हणून आम्हाला काळजी वाटते. आमची पण जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. यापुढे एकेक दिवस महत्वाचा आहे. एकेक दिवस पुढे जातो तशी आमची काळजी वाढत जाते. उद्या आमचे एक प्रतिनिधी मंडळ बाळासाहेबांशी भेट घेणार आहेत. मि स्वतः उद्या किंवा परवा जाऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असून त्यांना विनंती करणार आहे. अस देखील इम्तियाज जलील यांनी सांगितलं. त्यामुळे वंचित आणि एमआयएमच्या जागावाटपाचा तिढा सुटातासुटेना असच दिसून येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.