औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी भाषण आग लागल्याचे पाहायला मिळाले. वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथील सोहेल प्लास्टिक कंपनी या चटईच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दुर्घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून कंपनीच्या शेजारी अनेक घरे देखील आहेत. ही आग पसरू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितल.
वाळूज औद्योगिक वसाहतीत आग : औद्योगिक वसाहतीत असलेल्या सोहेल प्लास्टिक कंपनीला आज सकाळी ही आग लागली. भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. दोन ते तीन किलोमीटर दुरून आगीचे लोट दिसून येत होते. माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजलेले नाही.
शहागंज येथील भीषण आग : औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी अशा स्वरूपाची भीषण आग लागल्याचे समोर आले. रविवारी दुपारी शहागंज येथील एका दुकानाचा अशाच स्वरूपाची भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझविली. शहराची सर्वात जूनी बाजारपेठ असल्याने आसपास लोकवस्ती आणि व्यावसायिक दुकाने देखील होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.
हेही वाचा : 5 Biggest Plane Crashes In World : जगभरातले 5 सर्वात भीषण विमान अपघात; शेकडो नागरिकांना गमावला जीव