छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : सिडको भागातील कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे रविवारी सकाळी वर ऋषिकेश असोलेकार व वधु समृध्दी लाखे यांचा साखर पुडा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात याब या कार्यक्रमाचा शंभरावा भाग होत होता. त्यावेळी वर वधू वराडी मंडळी यांना कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे यांनी मन की बात पाहण्याबाबत विचारणा केली. वऱ्हाड मंडळी, वधू पिता जगदीश लाखे आणि वर पिता अशोक असोलेकर यांनी या स्तुत्य उपक्रमास संमती दिली. लगेच त्याबाबत तयारी करत, साखरपुडा विधी होण्याआधी सर्वांनी मन की बात चा शंभरावा भाग पहिला. यावेळेस वर ऋषिकेश व वधु समृध्दी तसेच पाहुणे मंडळी, शेजारी असलेले लहान विद्यार्थी - विद्यार्थिनी जवळपास २५० जण उपस्थित होते. यावेळी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनीही या स्तुत्य उपक्रमास भेट दिली व वरवधूंना शुभेच्छा दिल्या. हा स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी श्री विलास कोरडे, सौ अलका कोरडे, चंद्रमुनी जायभाय, अनिल गावंडे, अमित केसाळे यांनी सहकार्य केले.
शहरात 350 ठिकाणी भाजप ने केले नियोजन : पंतप्रधान मोदींच्या "मन की बात" साठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 350 ठिकाणी तयारी केल्याची माहिती केंद्रीय अर्थरज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा 100 वा भाग होता. हा भाग ऐकण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 350 ठिकाणी या कार्यक्रमासाठी तयारी करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी संभरहून अधिक नागरिकांनी कार्यक्रम पाहिला. होकल ते लोकल आणि लोकल ते ग्लोबल हे विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले आहे. त्यामुळे आता छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांमध्ये विश्वास वाढणार असून, व्यापाऱ्यांना संधी मिळणार आहे असे मत केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केले आहे.