ETV Bharat / state

मराठवाडा गारठला.. औरंबादेत 15 तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सिअस तापमान

मराठवाड्यात गारवा वाढला असून. औरंगाबादेत व परभणीमध्ये 15.5 अंश सेल्सीअस तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे.

author img

By

Published : Jan 17, 2020, 1:48 PM IST

marathwada-temperature-decreased-up-to-14-degree-celsius
मराठवाड्यात गारवा वाढला; औरंबादेत 15 तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सीअस

औरंगाबाद - मराठवाड्यात किमान व कमाल तापमानात घसरण झाली असून, गारठा वाढत चालल्याचा थंडगार अनुभव लोकांना मिळत आहे. औरंगाबादमध्ये किमान तापमान 15.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात गारवा वाढला; औरंबादेत 15 तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सीअस

हेही वाचा - राज्यभर हुडहुडी! निफाड @ 2.4 अंशावर, नंदुरबारमध्येही पारा घसरला

औरंगाबाद बरोबर परभणी 15.5 अंश सेल्सिअस तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढत असल्याने भर दिवसादेखील गरम कपड्यांचा वापर लोकांना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी जशी वाढत आहे तसे औरंगाबादेत सकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे.

थंडीत शरीर कमवण्यासाठी युवकांचे पाय व्यायाम शाळेकडे वळू लागले आहेत. पुढील काही दिवसात पारा अजून घसरण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.

Intro:मराठवाड्यात किमान व कमाल तापमानात घसरण सुरू झाली असून मराठवाड्यात गारठा वाढत चालल्याचा थंडगार अनुभव लोकांना मिळत आहे. औरंगाबाद किमान तापमान 15 .5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.Body:औरंगाबाद बरोबर परभणी 15.5 तर नांदेडमध्ये 14.0 अंश तापमान असल्याची नोंद झाली आहे. थंडी वाढत असल्याने भर दिवसा देखील गरम कपड्याचा वापर लोकांना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसंपासून थंडी जशी वाढत आहे तस औरंगाबादेत सकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे.Conclusion:जशी थंडी वाढत आहे तस थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसून येत आहेत. गरम कपड्यांचा वापर तर करावाच लागतो मात्र भर दिवसा सूर्य नारायण देखील ढगाळ वातावरणामुळे दर्शन देत नसल्याने उन्हाची ऊब मिळत नाहीये. त्यामुळे दिवसभर स्वेटर वापरावं लागत आहे. सकाळी रात्रीच्या वेळी शेकोटीचा आनंद नागरिक घेत आहेत. सकाळच्या सत्रात थंडीत फिरणे व चालणे पोषक असल्याने मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकाच्या संख्येत वाढ झालीय. थंडीतही मपलर ,रुमाल ,स्वेटर्स परिधान ,करून मॉर्निंगवॉकसाठी पहाटे औरंगाबादमध्ये मैदानात गर्दी करत आहेत. थंडीत शरीर कमवण्यासाठी युवकांचे पाय व्यायाम शाळेकडे वळू लागले आहेत. पुढील काही दिवसात पारा अजून घसरण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.