औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणूकीत बंडखोर उमेदवारांमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी डोके दुःखी ठरत आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षामध्ये बंडखोरी झाली असून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांना त्यांच्याच पक्षातील प्रदीप सोळुंखे यांनी तर भाजपच्या बाहेरून आलेल्या किरण पाटील यांना भाजपचे खांदे समर्थक नितीन कुलकर्णी यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे पक्षांना यश मिळेल की लढाईत इतर कोणी कोणी बाजी मारेल असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.
पुन्हा निवडून येणारच राष्ट्रवादीला विश्वास : मराठवाडा शिक्षक मतदार संघावर आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. यंदाही राष्ट्रवादीने त्यांचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांना उमेदवारी दिली. मराठवाड्यात असलेल्या अधिक मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्था हेच राष्ट्रवादीच्या विजयाचे गणित आहे. विक्रम काळे सतत निवडून येत असेल तरी त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवल्या नाहीत. असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र पुन्हा निवडून येणारच हा विश्वास विक्रम काळे यांना आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंखे यांनी विक्रम काळे यांच्या विरोधात बंडखोरी केली. उपद्रव मूल्य दाखवल्याशिवाय पक्षात सन्मान मिळत नाही असे म्हणत सोळुंखे यांनी स्वतःच्याच पक्षाचे उमेदवार विक्रम काळे यांच्यावर टीका केली. शिक्षक मतदारांची लाट असल्याने तेच मला निवडून देणार असा विश्वास प्रदीप सोळुंखे यांना आहे.
भाजप विजयाच्या प्रतीक्षेत : राष्ट्रवादी पाठोपाठ भाजप मध्येही बंडखोरी झाली आहे. भाजपने थेट बाहेरचाच उमेदवार दिल्याने पक्षाचे नितीन कुलकर्णी यांनी बंड पुकारले. भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी दिली. मराठवाडा शिक्षक मतदार संघात मराठा उमेदवार निवडून येतो हे गणित ओळखून भाजपने पहिल्यांदा मराठा उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे भाजपचे खंदे आणि प्रामाणिक कार्यकर्ता नितीन कुलकर्णी यांना अनेक वर्षांपासून उमेदवारीची हुलकावणी मिळत होती. यंदाही त्यांना डावलून बाहेरून मराठा उमेदवार आल्याने तेही दुखावले आहेत. म्हणून त्यांनीही बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवली. तरी जनसंपर्क असल्याने आपण विजयी होऊ असा विश्वास भाजप उमेदवार किरण पाटील यांना आहे.
संघटनांमध्ये मतांचे विभाजन : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात मराठा उमेदवार विजयी होतो असा इतिहास आहे. राष्ट्रवादी नेहमी मराठा कार्ड खेळते आणि विजयी होते. म्हणून भाजपने यंदा आपले कार्ड बदलले. दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा म्हणून मतांचे विभाजन होणार. या विभाजनाचा फायदा घेण्यासाठी मनोज पाटील हेही लढत देत आहेत. मनोज पाटील शैक्षणिक चळवळीत मराठवाड्यात परिचयाचा चेहरा आहे. मात्र कोणत्याही मोठ्या पक्षाची ताकद नसली तरी मराठा उमेदवार म्हणून नशीब आजमावत आहेत. त्यामुळे मतांच्या विभाजनाचा फायदा घेत मनोज पाटील नशीब आजमावत आहे. धनशक्ती विरोधात आपला लढा असल्याचं त्यांनी सांगितलं. तर बच्चु कडू यांच्या प्रहार संघटनेची मदत घेत मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील देखील निवडणूक लढवत आल्याने नेमके यश मिळणार कोणाला याबाबत उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा : Sanjay Raut News : विरोधकांनी भारत जोडो यात्रेत केवळ चार किलोमीटर तरी चालवून दाखवावे - संजय राऊत