छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यात तरुणांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मागील आठवड्यात सुनील कावळे या आंदोलकानं मुंबईत आत्महत्या केल्यावर गुरुवारी एका तरुणानं केली. आली. गणेश काकासाहेब कुबेर या तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आरक्षण मिळेपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असं त्याने शाळेच्या पाटीवर लिहून ठेवले आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी सोलापूर- धुळे महामार्गावर आंदोलन करत तयार जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला.
पाटीवर संदेश देऊन आत्महत्या- सोलापूर धुळे महामार्गावर असलेल्या आपतगाव येथे राहणाऱ्या गणेश कुबेर याने सकाळी आत्महत्या केली. त्यासाठी त्याने शाळेच्या पाटीवर आरक्षण मिळेपर्यंत मला जाळू नका एक मराठा लाख मराठा" असा मजकूर लिहून ठेवला होता. ही वार्ता कळताच कुटुंबीयांना धक्का बसला. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांना मदत मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तर रात्री ग्रामस्थांनी सोलापूर धुळे महामार्गावर आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलन करत टायर जाळून सरकारचा निषेध केला. गणेश कुबेरच्या मागे आई, वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे.
दोन आठवड्यात काही जणांनी संपवले जीवन... मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पाच वर्षांपूर्वी 48 जणांनी आपले जीवन संपवले होते. त्यानंतर आंदोलन काहीसं शांत झाल्यानंतर न्यायालयीन लढाई सुरू झाली. मात्र, काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा आंदोलन सक्रिय झाले. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू करून सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला. मात्र तो वेळ संपायच्या आधीच रामनगर मुकुंदवाडी येथे राहणाऱ्या सुनील कावळे या आंदोलकाने आत्महत्या केली. त्यानंतर मराठवाड्यात तीन ते चार आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुरुवारी दिवसभरात मराठवाड्यात हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर येथे दोन तरुणांना आपले जीवन संपवले. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, असे आवाहनदेखील केले आहे. तरीही मराठा बांधव आरक्षणाच्या मागणिकरिता आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
हेही वाचा-