औरंगाबाद - गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी गावात अनेक नागरिकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये गावातील अनेक नागरिकांना, लहान मुलांना विषबाधा झाली आहे. गावातील विषबाधा झालेल्यांना चक्कर, मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.
हेही वाचा - उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडाली कार, दरवाजे लॉक झाल्याने काच फोडून दोघांना वाचवले
विषबाधा होण्याचे कारण काय? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. विषबाधेत गावातील अनेक नागरिक, लहान मुले यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याबाबतची माहिती मिळताच आरोग्य आरोग्य विभागाचे पदाधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांनी तुर्काबाद खराडी गाव गाठले. आरोग्य विभागातील पथकाकडून गावातच बाधित लोकांवर उपचार करण्यात आले असून काही नागरिकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - शिवसेना कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन