छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : मी वापरलेल्या शब्दांचा विपर्यास केला जातोय. मात्र माझा म्हणायचा उद्देश हा वेगळा होता. त्याला जातीवादाचा रंग दिला जातोय. दोन समाजात जर माझ्यामुळं तेढ निर्माण होत असतील तर मी वापरलेला 'तो' शब्द मागे घेतो असं मत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमच्या युवकांच्या व्यथा मी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मुद्दाम जातीवादाकडं वळवण्यात आलं. मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोनिया गांधींचं उदाहरण देत एक सल्ला दिला. या सल्ल्यावर आता मनोज जरांगेंनी मी लायकी शब्द मागे घेत असल्याचं सांगितलं. सगळ्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिले नाही. सगळे नेते दोषी आहेत. सगळ्याच पक्षांचे नेते आम्हाला घेराव घालण्यात येत आहे. अटक करणार नाही म्हणाले, मात्र अटक केली. भुजबळ जातीय तेढ निर्माण करतात. तीच सरकारची भूमिका आहे का?
काय होतं विधान : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सभेत चांगलं शिक्षण घेऊनही लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली मराठा युवकांना काम करावं लागतं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील म्हणाले की, मी जे बोललो ते बरोबर आहे. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय. आमचे मुलं उच्च शिक्षण घेतात हुशार असतात. मात्र असे असूनही बेरोजगारीमुळं इतरांचे झेंडे पकडतात. त्या लोकांचं शिक्षण काय? काही लोक तर जास्त शिकलेलीही नसतात. तरीदेखील त्यांचे झेंडे उचलावे लागतात, असा त्याचा अर्थ होता. मात्र त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून त्याला जातीकडं ओढण्याचं काम केलं जातंय.
मुळात मी कधीही जातीवाद केलेला नाही आणि करणारही नाही. मात्र माझ्या वक्तव्याला चुकीचा अर्थ लावला जातोय. जर त्यामुळे तेढ निर्माण होणार असेल तर मी शब्द मागे घेतो, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला मान्य करतो. आमच्याकडे कोणीही सल्लागार नाहीत. आम्ही त्यांचा आदर करतो. कारण की ते नेहमी खरं बोलतात. त्यामुळेच त्यांनी दिलेला सल्ला आम्ही मान्य केला-मनोज जरांगे पाटील
भुजबळ दलितांचा अवमान करतात : चांगलं शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. त्यामुळं बेरोजगार झालेले युवक कोणाचाही झेंडा पकडतात अशाबाबतचं हे वक्तव्य होतं. मात्र त्याला दुसऱ्या अर्थानं जातीचा रंग देऊन घेतलं गेलं. आम्ही कुठंही जातीचा उल्लेख केलेला नाही. मात्र दलित समाजाचे लोक गेले म्हणून भुजबळ यांनी हुतात्मा स्मारक गोमुत्रानं धुतलं होते हे विसरले का? असा संतप्त प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. आज ओबीसी लोकांनादेखील यांच्यामुळं पश्चाताप सहन करावा लागतोय, अशी टीकादेखील त्यांनी केली.
- बबनराव तायवाडे यांनीदेखील मागे घेतले शब्द- मनोज जरांगे पाटील यांनी शब्द मागे घेतल्यानंतर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनीदेखील वादग्रस्त शब्द मागे घेतले आहेत. आमच्या नेत्यांच्या घरावर हल्ले करणार्यांचे हात-पाय तोडू असं बबनराव तायवडा यांनी हिंगोलीतील सभेत वक्तव्य केले होते.
हेही वाचा :