ETV Bharat / state

मुंबईला जाण्याचा मार्ग ठरला, मनोज जरांगे यांनी सांगितलं नियोजन

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. २० जानेवारी रोजी अंतरवाली येथून मुंबईला पायी जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिलीय. त्याबाबतचे नियोजन जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे.

Maratha Reservation
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 10:50 PM IST

Updated : Dec 28, 2023, 10:58 PM IST

प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil : २० जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली येथून मुंबईला पायी जाणार असल्याची माहिती, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिली. आपण आहोत तोपर्यंत आपल्याला मुलांना आरक्षण मिळवून द्यायच आहे, ही आरक्षणाची शेवटची लढाई आहे. कुणीही घरी थांबवू नका. पायी यात्रेत सहभागी व्हा, समाजाचा मुलगा म्हणून प्रयत्न करतोय सर्वांनी साथ द्या. सगळ्यांनी आचारसंहिता पाळूनच पायी यात्रेत सहभागी व्हा. आपलं रक्षण आपणच करायचं आहे. मराठा समाज मुंग्यांसारखा पायी यात्रेत सहभागी झाला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. उपचार घेऊन जरांगे पाटील गुरुवारी सायंकाळी गावी गेले.

जरांगे पाटील ठणठणीत, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना अशक्तपणा, किडणीवर सूज, खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. आजारावर 5 दिवस उपचार घेतल्यानंतर जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटील अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. जरांगे सध्या मुबंई मोर्चाच्या नियोजनाच्या कामाला लागलेत.

असा असणार मार्ग : ओबीसी मधूनच आरक्षण द्या या मागणीसाठी २० जानेवारी रोजी मराठा समाज मुंबईला पायी जाणार आहे. अंतरवालीहुन सकाळी नऊ वाजता प्रवास सुरू होईल. शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, अहमदनगर, सुपा शिरूर, रांजणगाव, वाघोली, लोणावळा पनवेल वाशी चेंबूरमार्गे आझाद मैदान शिवाजी पार्कवर जाणार आहे. काही सदस्य मुंबईला जाऊन पाहणी करून येणार आहेत. सगळ्या वस्तू सोबत घेऊनच चला. कशाचीही कमतरता पडणार नाही याची काळजी घ्या, पायी यात्रा ज्या गावातून जाईल त्या गावातील लोकांनी सहकार्य करावे. पाण्याची व्यवस्था करावी. जे पायी मुंबईला येतील त्यांनी गाडीला घर बनवावं. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने स्वयंसेवक व्हावे. महिलांची वेगळी तुकडी असेल, कुणीही व्यसन करायचं नाही. सर्व आंदोलकांना मोर्चाचं नियोजन पाठवणार, औषध गोळ्याही सोबत असू द्या. आंदोलकांनी गाडीतच झोपावे. गावकऱ्यांनी वर्गणी करून गाड्यांचा खर्च करावा. पायी मोर्चाच्या नावाखाली कुणीही पैसे देऊ नका आणि दिले असतील तर माघारी घ्या. यात्रेला अजून नाव दिलं नाही पण नक्की देऊ आज फक्त रूट सांगितला आहे. एक महिन्यापेक्षा जास्त सामान पुरेल एवढं सामान सोबत घ्या. ७० - ८० वर्षात एकही नेता आपले मुलं मोठे करायला पुढे आला नाही. आता आपल्यालाच आपले मुलं मोठे करायचे आहेत. मराठे मुंग्यांसारखे आंदोलनात दिसले पाहिजेत. या लढ्यात सगळे सहभागी व्हा सगळे जण या मोर्चाचे साक्षीदार बना. पायी मोर्चात शांतता असली पाहिजे उद्रेक नको, आंदोलन शांततेतच झालं पाहिजे असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय.

ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे : मराठा समाजाने आता सज्ज व्हावे गाफील राहू नका, आतापर्यंत ५४ लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं हे तुमच्या एकजुटीने प्राप्त झालं, जालन्यात एका नोंदीवर ७० जणांना लाभ मिळाला ५४ लाख नोंदींमुळं २ कोटी लोकांना लाभ होईल. सरकारने क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली आहे. हेही आरक्षण आपण घ्यायला तयार पण हे आरक्षण टिकेल का? हे सरकरने जाहीर करावं. क्युरेटीव्ह पिटीशनच सगळं श्रेय हे गोरगरीब मराठ्यांच आहे. हे माय बापाचं श्रेय आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्यानं कायदा पारीत करा आणि ओबीसीतून सरसकट आरक्षण देऊन टाका. आम्ही ओबीसी आरक्षणातच आहोत. त्यामुळं आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं. सरकारने एकदाचा कायदा पारीत करावा आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण देऊन टाकावं. परीक्षा पास होऊनही नियुक्त्या नाही मिळाल्या त्यामुळं मराठ्यांचे पोरं बरबाद झाले. माझ्याकडे काही विद्यार्थीनी येऊन रडल्या. त्यांचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्या कानावर टाकला आहे तो ही प्रश्न मिटेल, असं देखील मनोज जरांगे यांनी सांगितलं.

हरिभाऊ राठोड यांनी सल्ले देऊ नये : हरीभाऊ राठोड यांनी सतत पत्रकार परिषदा घेऊन संभ्रम निर्माण करू नये, राठोड यांच्या फॉर्म्युलामध्ये सगळया मराठ्यांना न्याय मिळू शकत नाही. जीव गेला तरी आता माघार नाही. तसेच वेळप्रसंगी गोळ्या घातल्या तरीही माघार घेणार नाही. मोर्चाने काय होणार आहे की नाही याबाबत सल्ला देण्याची त्यांना गरज नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. राजकिय नेत्यांना आमचं आवाहन आहे की, सत्ताधारी विरोधकांनी मराठ्यांच्या पाठिशी उभं राहावं, ते रॅलीतही सहभागी होऊ शकतात. आम्हाला पोलीस परवानगी देणारच आहे, कारण आम्ही शांततेत मोर्चा काढणार आहोत. हरीभाऊ राठोड यांनी समाजकारणाचं बघावं, राजकारणाचे सल्ले देऊ नये, त्यामुळंच त्यांचा फॉर्म्युला आम्हाला आवडलेला नाही अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

हेही वाचा -

  1. मराठा आंदोलनाचा राम मंदिर सोहळ्याशी संबंध नाही - मनोज जरांगे
  2. मराठा आरक्षणानंतर मुस्लिम, धनगर आरक्षणासाठी लढणार - जरांगे
  3. मराठा समाजाला दिलेले कुणबी दाखले रद्द करा, प्रकाश शेंडगे यांची मागणी

Last Updated : Dec 28, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.