ETV Bharat / state

शेतातील रस्त्याच्या वादातून 12 जणांची तुफान हाणामारी, चुलत्याचा मृत्यू - शेतीच्या वादातून हत्या

औरंगाबादमध्ये 'आमच्या शेतातील रस्त्यातून तुम्ही का जाता' असे म्हणत 12 जणांनी चुलत्याला घरात शिरुन गजाने मारहाण केली. या हाणामारीत एका ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर जखमी झाले. माणिक दादा नवपुते असे मारहाणीतील मृताचे नाव आहे. तर, याप्रकरणी पोलिसांनी श्रीराम नवपुते आणि भास्कर नवपुते यांना अटक केली आहे.

Aurangabad
Aurangabad
author img

By

Published : Jun 27, 2021, 8:47 PM IST

औरंगाबाद - आमच्या शेतातील रस्त्यातून तुम्ही का जाता, असे म्हणत 12 जणांनी चुलत्याला घरात शिरुन गजाने मारहाण केली. यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत एका ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर जखमी झाले. ही घटना २६ जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घारदोन शिवारात घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना अटक केली आहे. माणिक दादा नवपुते (६५ वर्षे, रा. घारदोन) असे मारहाणीतील मृताचे नाव आहे.

शेतातून जाण्यावरून पेटला वाद

घारदोन शिवारातील गट क्रमांक ७८ मध्ये माणिक नवपुते यांची शेती आहे. तसेच पुतण्या श्रीराम जनार्दन नवपुते, भास्कर भुजंगराव नवपुते यांचेही येथेच शेत आहे. माणिक यांना शेतात जाण्यासाठी श्रीराम व भास्कर यांच्या शेतातून रस्ता आहे. माणिक यांचा थोरला मुलगा गोरख याला शेतातील रस्त्यावरुन जाण्यास श्रीराम व भास्करने मज्जाव केला होता.

ट्रॅक्टर का नेला म्हणत घरात घुसून मारहाण

शेतात सरकी लावण्यासाठी माणिक यांनी ट्रॅक्टर आणला होता. त्यावेळी श्रीरामचा मुलगा रवी याने ट्रॅक्टर चालकाला शिवीगाळ केली. दरम्यान, रात्री 8 वाजण्याच्या सुमारास श्रीराम, भास्कर, रवी, अमोल बद्री नवपुते, हरी बाबुराव नवपुते, राम बाबुराव नवपुते, बापू भुजंगराव नवपुते, शोभाबाई श्रीराम नवपुते, मंगल बद्रीनाथ नवपुते, नंदा भास्कर नवपुते, मंगल बाबुराव नवपुते यांनी घरात शिरुन माणिक व त्यांचा धाकटा मुलगा विक्रम यांना शिवीगाळ केली. तसेच, आमच्या शेतातून का जाता, म्हणत गजाने मारले. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या माणिक यांचा थोरला मुलगा गोरख, सून वर्षा यांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान माणिक हे घरातून बाहेर येताच त्यांच्या डोक्यात गज घातल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. तर गोरख व विक्रम हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

दोघांना अटक

या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीराम नवपुते आणि भास्कर नवपुते यांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, जमादार डी. एस. करंगळे, प्रकाश शिंदे हे करत आहेत.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.