औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड शहरातील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण व संतोष जाधव यांच्यावर रोडरोमिओने तलवारीने प्राणघातक हल्ला (Assault with sword) केला. आरोपी माज्जीद जमील शेख शालेय परिसरात गाडीवरून चकरा मारत होता. मुख्याध्यापक शिक्षकांसह आरोपीच्या वडीलांना भेटण्यासाठी जाताना माज्जीद जमील शेख चौकात तलवारीने हल्ला केला. यात मुख्याध्यापकासह कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी माज्जीद जमील शेख पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
Accused Arrested: कन्नड येथे मुख्याध्यापकावर हल्ला करणाऱ्याला पुण्यातून अटक - मुख्याध्यापकाला मारहाण
मुख्याध्यापकाला मारहाण (Beating the headmaster) करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक (Accused Arrested) केली आहे. मुख्याध्यापक काकासाहेब देशमुख आणि संतोष जाधव यांच्यावर हल्ला करून आरोपी पुण्याला पळून गेला होता. मात्र अवघ्या काही तासात आरोपी माज्जीद जमील शेखला अटक केली.