ETV Bharat / state

औरंगाबादमधील कोरोना रुग्णांची संख्या ९०० पार; शहरातील लॉकडाऊन वाढवला

औरंगाबादेत कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात २० मेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तसे आदेश काढल्याने पुढील चार दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

lockdown in Aurangabad city extended in order to stop spread of coronavirus
औरंगाबादमधील कोरोना रुग्णांची संख्या ९०० पार; शहरातील लॉकडाऊन वाढवला..
author img

By

Published : May 16, 2020, 10:32 PM IST

औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये १८ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र रुग्णांची सतत वाढणारी संख्या पाहता हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या ९०१वर पोहोचली आहे. ही संख्या आणखी वाढू नये, यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. पोलीस प्रशासनाकडून शहरातील कन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यासोबतच, कन्टेनमेंट झोनमधून बाहेरील भागात, तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कन्टेनमेंट झोनमध्ये होणारे आवागमन बुधवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले गेले आहेत.

स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त या सर्वांच्या समन्वयातून हा निर्णय घेण्यात आला. यानंतरही २० मेपर्यंत कोरोनाबधितांची संख्या अशीच वाढत राहिली, तर हा लॉकडाऊन रविवार (२४ मे)पर्यंत वाढविण्यात येणार आहे. २४ मेपर्यंत देखील रुग्णसंख्या वाढतच राहिली तर त्यानंतर दररोज केवळ ७ ते ११ पर्यंतच नागरिकांना बाहेर येण्याची मुभा देण्यात येईल.

हेही वाचा : नागपूर-औरंगाबाद या महामार्गावर ट्रक उलटला, चालकासह क्लीनर गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.