औरंगाबाद - सरकारने कलम 370 बाबत घेतलेला निर्णय सामाजिक, राजकीय, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मास्टर स्ट्रोक असल्याचे मत भारतीय सैन्या दलाचे सेवा निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतिष ढगे यांनी व्यक्त केले. हे संशोधन विधेयक काल (सोमवारी) राज्यसभेत मंजुर झाल्यानंतर ढगे यांनी प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कश्मीर प्रश्नाबाबत समस्या मांडली होती, त्यावेळी ट्रम्प यांनी आपण मध्यस्ती करू असे सांगितले होते. मात्र, या निर्णयानंतर त्यांना सरकारने आम्हाला कोणाच्या माध्यस्तीची गरज नाही आणि आम्ही सक्षम आहोत हे दाखवून दिले आहे. असे ढगे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, जम्मू कश्मीर हा वेगळा केंद्रशासित प्रदेश आणि लडाक हा वेगळा प्रदेश करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर एकत्र ठेवून समाज जोडून ठेवण्याचे काम सरकारने केले असून तिथे त्यांची वेगळी विधानसभा होणार आहे. सरकारडे बहुमत आणि राजकीय इच्छाशक्ती असल्यावर ७० वर्षे जुने प्रश्न सुटू शकतात हे यानिमित्ताने दिसून आले.
तत्पूर्वी आज (मंगळवारी) हे विधायक लोकसभेत माडले जाणार आहे. सरकारकडे बहुमत असल्याने, ३७० संबंधीचे विधेयक लोकसभेतही मंजुर असे दिसत आहे.