ETV Bharat / state

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, अहमदनगर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घटना - tiger

वन अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे जागीच शविच्छेदन केले. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
author img

By

Published : Apr 27, 2019, 10:41 AM IST

औरंगाबाद - अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना अहमदनगर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कायगाव शिवारात घडली आहे. रस्ता ओलांडत असताना या बिबट्याला धडक बसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर रस्त्यावरून काही अंतरावर असलेल्या गवतामध्ये त्याचा मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

कायगाव शिवारातील कलमीच्या ओढ्याजवळ या बिबट्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने बिबट्या फरफटत काही अंतरावरील गिन्नी गावा जवळ लंगडत गेला. जवळच २५ फुटावर शेतवसती असलेले शेतकरी अनिल आसाराम निकम हे तिकडे गेले असता, त्यांना गंभीर जखमी नर बिबट्या दिसला. त्यांनी लगेच प्राणी मित्र रामचंद्र बिरुटे यांना दूरध्वनी करून बोलवून घेतले. बिबट्याच्या जवळ जाण्यास कोणीच धाडस करत नव्हते, अशा वेळी प्राणी मित्र रामचंद्र बिरुटे यांनी धाडस करून लांब काठीने बिबट्याचे शेपूट हलवून पाहिले. तो अर्धा तास जिवंत होता. त्यानंतर बिबट्याचा मृत्यू झाला.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत बिबट्याच्या पायांचा माग पाहिला. त्यास कुठे कुठे इजा झाली याचे निरीक्षण केले. तो मृत नर बिबट्या अंदाजे साडे तीन ते चार वर्षे वयाचा असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. वन अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे जागीच शविच्छेदन केले. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शविच्छेदनानंतर कलमीच्या ओढ्याजवळ सर्व शासकीय नियानुसार बिबट्याचे दहन करण्यात आले.

Intro:औरंगाबाद - नगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कायगाव शिवारात अन्न, पाणी आणि शिकारच्या शोधात निघालेला बिबट्या रस्ता ओळडतांना अज्ञात वाहनाच्या जोराच्या धडकेत ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.Body:शिवारात कलमीच्या ओढ्या जवळ रोड क्रॉस करत असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची घडक दिली.
Conclusion:अपघातात बिबट्याच्या मानेला, लिव्हरला, मागच्या उजव्या पायला जबर मार लागून तो गंभीर जखमी अवस्थेत रोडवरून बाजूच्या गट क्रमांक 156 शेतात फेकला गेला. तो फरफडत रोड च्या लगतच्या लसूण गावताच्या शेतात पडला. तेथून तो काही अंतरावरील गिंन्नी गवता जवळ लंगडत लंगडत गेला. जवळच 25 फुटावर शेतवस्ती असलेले शेतकरी अनिल आसाराम निकम हे तिकडे गेले असता त्यांना गंभीर जखमी नर बिबट्या दिसला. त्यांनी लगेच प्राणी मित्र रामचंद्र बिरुटे याना दूरध्वनी करून बोलून घेतले. बिबट्याच्या जवळ जाण्यास कोणीच धाडस करत नव्हते आशा वेळी प्राणी मित्र रामचंद्र बिरुटे यांनी धाडस करून लांब काठीने बिबट्याचे शेपूट हळून पाहिले. तो अर्धा तास जिवंत होता. त्यानंतर बिबट्याचा मृत्यू पावला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत बिबट्याच्या पायांचा माग पाहिला. त्यास कुठे कुठे इजा झाली याचे निरीक्षण केले.तो मृत नर बिबट्या साडे तीन ते चार वर्षे वयाचा असावा, त्याचे वजन 55 ते 60 किलो असावे. त्याच्या नाकाच्या टोकापासून शेपूट पर्यन्त लांबी 195 सेंटीमीटर असून त्याची पाय ते पाठी पर्यन्त उंची 64 सेंटीमीटर होती. वन अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे जागीच शविच्छेदन केले. अन्न पाणी,शिकार च्या शोधात बिबट्या निघाला होता.त्याला वाहनाचा जबर फटका लागला.त्यात तो मृत पावला.त्याच्या डोक्याला मार, मान मोडली, दोन्ही बरगड्याच्या दोन्ही बाजूला मार लागला , मागच्या पायच्या उजवी मांडी मोडली,त्याच्या पोटाच्या आत रक्तसराव जास्त झाल्याने मृत झाला आहे.याबाबत आम्ही आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. बिबट्याच्या डोक्याला , मानेला, मागील उजव्या पायच्या मांडीला, पंज्याला जबर मार लागला होता. बाकी इतर अव्यवय ठीक होते, असे डॉक्टर यांनी सांगितले. शविच्छेदना नंतर कलमीच्या ओढ्यात पंचलोकांच्या समक्ष सर्व शासकीय नियानुसार बिबट्याचे दहन करण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.