ETV Bharat / state

Leopard Escaped : शेतकऱ्याची खेळी, बिबट्या खातो शेळी, वनविभागाची रिकामी झोळी

author img

By

Published : Jul 29, 2023, 12:46 PM IST

Updated : Jul 29, 2023, 3:00 PM IST

छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील शिंगी पिंपरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील शेळ्याच्या गोठ्यात बिबट्या शिरला. शेळीची शिकार करुन त्यावर ताव मारण्यात गुंतलेल्या बिबट्याला शेतकऱ्याने गोठ्यात कोंडले. परंतु वनविभागाच्या ढिसाळ कामामुळे जेरबंद झालेला बिबट्या पळून जाण्यात यशस्वी झाला.

गोठ्यात अडकला बिबट्या
गोठ्यात अडकला बिबट्या
गोठ्यात अडकला बिबट्या

छत्रपती संभाजीनगर: गोठ्यात शिरुन एका बकरीचा फडशा पाडून त्यावर ताव मारण्यात मग्न झालेल्या बिबट्याला शेतकऱ्याने मोठ्या शिताफीने गोठ्यात कोंडले. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची झोप उडवणारा बिबट्या जाळ्यात अडकला होता. बिबट्याला पकडण्यात आल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. परंतु वनविभागाच्या भोंगळ नियोजनामुळे बिबट्या तेथून पळून जाण्यास यशस्वी झाला.

तावडीत आलेला बिबट्या पळाला: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात 2 महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. येथील नरहरी रांजगाव शिवारात बिबट्याने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पशूधनाला आपले भक्ष्य बनवत आहे. दरम्यान एका शेतकऱ्याने शक्कल लढवून बिबट्याला गोठ्यात कोंडले. तब्बल 3 तास बिबटया गोठ्यात जेरबंद होता. त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडू लागले. परंतु त्यांच्या ढिसाळ तयारीमुळे बिबट्याने तेथून पलायन केले.

शिंगी पिंपरी शिवारात बिबट्याचा थरार: गंगापूर तालुक्यातील शिंगी पिंपरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. पशूधनाला बिबट्या आपली शिकार बनवत आहे. दरम्यान या बिबट्याने शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राऊसाहेब पवार राहत असलेल्या वस्तीवरील कुत्र्यावर हल्ला केला. तेथे असलेल्या शेतकऱ्यांनी आरडा-ओरडा केला. शेतकऱ्यांच्या आवाजामुळे बिबट्याने ओढ्याकडे धूम ठोकली. त्यानंतर बिबट्या नरहरी राझंणगाव शिवारातील गट क्रमांक 143 परिसरात गेला. येथील शेतकरी सुकदेव म्हस्के यांच्या शेतात बकऱ्यांसाठी बांधलेल्या जाळीच्या गोठ्यात हा बिबट्य़ा शिरला. त्यावेळी सुकदेव म्हस्के झोपलेले होते. बिबट्या गोठ्यात शिरल्यानंतर शेळ्या ओरडू लागल्या. शेळ्यांच्या आवाजाने म्हस्के यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर बिबट्या शेळ्याच्या गोठ्यात दिसला. म्हस्के यांनी मोठ्या धाडसाने गोठ्याचे दार बंद करत त्याला कुलुप ठोकले आणि बिबट्याला कोंडले. त्यावेळी गोठ्यात 10 ते 15 शेळ्या बांधलेल्या होत्या. बिबट्याने त्यातील एका शेळीचा फडशा पाडला होता. त्या शिकारीवर तो ताव मारत होता.

वनविभाग अपयशी: बिबट्या गोठ्यात जेरबंद असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि गोठ्यात 3 तास बंदिस्त असलेल्या बिबट्याला पकडू लागले. परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ तयारीमुळे बिबट्या तिथून पळाला. जाळीच्या खालून निघून बिबट्याने पळ काढला. परिणामी बिबट्याला पकडण्यात वनविभाग अपयशी ठरले.

तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ: गंगापूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या भागात बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्याने दहापेक्षा अधिक पशुधनाची शिकार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतवस्तीवरील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान अनेक घटनांचे पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. अशात शेतकऱ्याच्या तावडीत सापडलेला बिबट्या वनविभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पसार झाला.

हेही वाचा-

  1. Leopard In Nashik : नाशिक जिल्ह्यात 80 टक्के शुगर कॅन लेपर्ड; 'हे' आहेत तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट
  2. Leopard Hunting Satara : रानडुकरासाठी लावला फास अन् अडकला बिबट्या; अखेर मृत्यू

Last Updated : Jul 29, 2023, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.