ETV Bharat / state

कोरोनाची रूग्णसंख्या स्थिरावली: दररोज दीड हजार रुग्णांची नोंद - Corona news in Aurangabad

जिल्ह्यात विना ऑक्सिजन बेड 13 हजार 538 इतके असून 1 हजार 801 इतके ऑक्सिजन बेड आहेत. तर आयसीयू बेड 708, व्हेंटिलेटर बेड 472 आहेत.

औरंगाबाद कोरोना आढावा
औरंगाबाद कोरोना आढावा
author img

By

Published : Apr 10, 2021, 5:45 PM IST

औरंगाबाद - गेल्या काही दिवसांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या स्थिरावल्याचे पाहायला मिळाले. मार्च महिन्याच्या मध्यावर अठराशे रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दीड हजाराच्या आत नवे रुग्ण आढळून येत आहे. त्यात शहरात नऊशे ते हजार आणि ग्रामीण मध्ये चारशेच्या जवळपास नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या स्थिरावल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे 14 हजार 825 ऍक्टिव्ह रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 1 हजार 413 नाविन रुग्ण आढळून आले असल्याने एकूण रुग्णसंख्या 95 हजार 448 इतकी झाली आहे. त्यात 78 हजार 696 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर 1927 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 14 हजार 825 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात मोजकेच बेड शिल्लक राहिल्याने नव्याने कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासन करत आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात विना ऑक्सिजन बेड 13 हजार 538 इतके असून 1 हजार 801 इतके ऑक्सिजन बेड आहेत. तर आयसीयू बेड 708,
व्हेंटिलेटर बेड 472 आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पुरेसा

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असला तरी औरंगाबाद जिल्ह्यात रेमडेसिवीरचा पुरेसा साठा असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली आहे. खाजगी मेडिकल मध्ये आणि सरकारी रुग्णालयात सध्या पर्याप्त साठा असून लवकरच नव्याने इंजेक्शनची मागणी केली आहे असे, देखील डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.