ETV Bharat / state

देवगाव रंगारी येथे शहीद ऋषीकेश बोचरेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - शहीद ऋषीकेश बोचरे

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील सुपुत्र ऋषीकेश बोचरे लेह-लडाखमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झाले. त्यांच्यावर मुळ गावी गुरुवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

martyr soldiar rishikesh bochare
देवगाव रंगारी येथे शहीद ऋषीकेश बोचरेवर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार
author img

By

Published : May 15, 2020, 8:17 AM IST

Updated : May 15, 2020, 11:05 AM IST

औरंगाबाद - लेह-लडाख येथे कर्तव्यावर असताना हिमस्खलन होऊन कन्नड़ तालुक्यातील देवगाव रंगारीचा जवान शहीद झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दुपारी 3 ते 4 वाजेचा दरम्यान ही वार्ता गावात कळताच कुटुंबियानी हंबरडा फोडला. गुरूवारी रात्री 9:30 च्या सुमारास या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषिकेश अशोक बोचरे (वय 27 वर्ष) राहणार देवगाव रंगारी, असे शहीद जवानाचे नाव आहे

martyr soldiar rishikesh bochare
देवगाव रंगारी येथे शहीद ऋषीकेश बोचरेवर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

ऋषीकेश 7 वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. तो सध्या लेह- लदाख येथे कार्यरत होता. मंगळवारी सकाळी हा जवान कर्तव्यावर असताना हिमस्खलन होऊन त्याखाली दबला गेला. हे सहकाऱ्याच्या लक्षात येताच वरिष्ठाना याबाबत माहिती देण्यात आली. काही वेळातच बचाव पथकाने जवानाला बर्फाखालुन बाहेर काढून त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यत खुप उशीर झाला होता. मंगळवारी जवळपास 3 वाजेच्या सुमारास सैन्य दलाच्या कार्यालयातुन दूरध्वनी येताच कुटुंबियानी हंबरडा फोडला.

देवगाव रंगारी येथे शहीद ऋषीकेश बोचरेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
देवगाव येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना सोबत घेऊन शासनाने पूर्ण तयारी केली होती. गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजता विशेष विमानाने शहीद ऋषिकेश यांचे पार्थिव औरंगाबाद येथे आणण्यात आले. विमानतळावर सर्व शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी अभिवादन केले. यावेळी खासदार इम्तियाज जलिल, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, ब्रिगेडियर उपेंदर सिंग आनंद यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच सैनिक पथकाद्वारे शहीद ॠषीकेश बोचरे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापूरे, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण आदी अधिकारी, सैनिक उपस्थित होते.

त्यानंतर ऋषिकेशचे पार्थिव औरंगाबादहून देवगाव या मूळ गावी आणण्यात आले. गावातून मिरवणूक काढून "अमर रहे अमर रहे" वीर जवान ऋषिकेश अमर रहे", "वंदे मातरम्" "भारत माता की जय" अशा घोषणा देण्यात आल्या. माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपूत, उपजिल्हा अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड़ तसेच पोलीस प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. पोलीस प्रशासन व सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या ऋषिकेश यांना सैन्यात जाण्याची इच्छा होती. बारावीनंतर त्यांनी त्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. गेल्या सात वर्षांपासून ऋषिकेश बोचरे लेह-लदाख येथे युनिट 119 असॉल्ट इंजिनियर रेजिमेंट, शस्त्रागार सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना राहण्यासाठी क्वार्टर मिळाले होते. मात्र कर्तव्य बजावरत असताना वीर मरण प्राप्त झाले. त्यांच्या पश्चात आजी, आई, वडील, पत्नी, एक भाऊ, वहिनी व एक बहिण असा परिवार आहे.

Last Updated : May 15, 2020, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.