कन्नड (औरंगाबाद) - जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापूस, मका, कांदा, टमाटे, आलं आदि पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे. पेरणीनंतर पिकांना खताची आवश्यकता असते. मात्र, सध्या बाजारात पुरेशी खते उपलब्ध होत नाहीत. राज्यसरकार व केंद्रसरकार खतं शेतकऱ्यांना देण्यात अपयशी ठरत आहे. शेतकऱ्यांना ती मिळत नसल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाला आहे. तर काही भागात अतिपाऊस ही झाला. पाऊस झाल्याने शेतकर्यांनी खरीपाच्या लागवड केलेली आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना लागणारे युरिया खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत होत आहे. असेच एक चित्र कन्नड तालुक्यातील चापानेर येथे पाहण्यास मिळाले. दुकानात जसे यूरिया खत आले की शेतकऱ्यांनी दुकानावर रांगाच रांगा लावलेल्या दिसल्या. त्यात एका शेतकऱ्याला एकच गोणी खत मिळत असल्याने शेतकरी नाराज झालेला दिसला आहे. मुबलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहेे.
कोरोना सारखा संसर्गजन्य आजाराचा फैलाव देशभरात झाला आहे. त्यात खत घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेली गर्दी मुळे कोरोना सारख्या आजाराला आपण निमंत्रण देतो का काय अशी गत निर्माण झालेली दिसली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा यावेळी उडालेला दिसला.