ETV Bharat / state

'हाताला काम द्या', फुलंब्री तालुक्यात मजुरांचे ठिय्या आंदोलन - labour agitates in phulambri

लॉकडाऊनच्या काळात असंघटीत क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला. यानंतर कामगार आणि मजूरांच्या हातचे काम गेले. यासाठी काम गेलेल्या मजुरांनी 'रोजगार द्या' या मागणीसाठी आंदोलन केले.

people agitates in aurangabad
'हाताला काम द्या', फुलंब्री तालुक्यात मजुरांचे ठिय्या आंदोलन
author img

By

Published : May 29, 2020, 8:03 PM IST

औरंगाबाद - लॉकडाऊनच्या काळात असंघटीत क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला. यानंतर कामगार आणि मजूरांच्या हातचे काम गेले. यासाठी काम गेलेल्या मजुरांनी 'रोजगार द्या' अशी मागणी करत आंदोलन केले. फुलंब्री तालुक्यातील धानोरा गावात मजुरांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या केला.

'हाताला काम द्या', फुलंब्री तालुक्यात मजुरांचे ठिय्या आंदोलन
लॉकडाऊनमुळे अनेक मजूर पुणे-मुंबई सारख्या शहरांतून आपल्या गावी परतले आहेत. मात्र गावी परत आल्यावर हाताला काम नसल्याने त्यांच्यावर पुन्हा उपासमारीची वेळ येण्याचे संकट आहे. त्यामुळे सरकारने रोजगार हमी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा सरकारने रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी मजूरांनी केली. मागील दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांना उपासमारीचा सामना करावा लागला. शहरातील कामे बंद झाल्याने मजूरांना माघारी गावी परतण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही. मात्र गावी गेल्यावर खिसा रिकामा असल्याने जगायचं कसं, असा प्रश्न त्यांना पडलाय. फुलंब्री तालुक्यातील धानोरा गावात अशाच काही मजुरांसह स्थानिकांनी आंदोलन केले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर या मजुरांनी ठिय्या पुकारला; आणि सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.