ETV Bharat / state

व्हिडीओ काढल्याच्या कारणावरून मजुराला कंपनी मालकाची मारहाण - एमआयडीसी वाळूज

शहरातील नोंदणीकृत माथाडी कामगार कामावर न घेता इतर राज्यातील कामगारांना कमी पैसे देऊन काम करून घेणाऱ्या कंपनी मालकाचा व्हिडिओ काढणाऱ्या मजुराला कंपनी मालकाने मारहाण केल्याची घटना एमआयडीसी वाळूज परिसरात घडली.

कंपनी मालकाची मारहाण
कंपनी मालकाची मारहाण
author img

By

Published : Aug 14, 2021, 10:40 PM IST

औरंगाबाद - शहरातील नोंदणीकृत माथाडी कामगार कामावर न घेता इतर राज्यातील कामगारांना कमी पैसे देऊन काम करून घेणाऱ्या कंपनी मालकाचा व्हिडिओ काढणाऱ्या मजुराला कंपनी मालकाने मारहाण केल्याची घटना एमआयडीसी वाळूज परिसरात घडली.

व्हिडीओ काढल्याच्या कारणावरून मजुराला कंपनी मालकाची मारहाण

राजु फकीरचंद हिरेकर (वय 37 रा.रांजणगाव, न्यु गणेश नगर) असे मारहाण झालेल्या मजुराचे नाव आहे. राजू यांनी दिलेल्या माहितीवरून ते माथाडी कामगार मंडळाचे नोंदणीकृत कामगार असून त्यांना एम.आर. ए. लॉजिस्टिक कंपनीत कामाला होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कंपनीने कामावरून कमी केले. राजू यांच्यासह इतर कामगारांच्या जागी कंपनी मालकाने उत्तर प्रदेश, बिहार, नेपाल येथून कामगार आणून कमी पैश्यामध्ये त्यांच्याकडून काम करून घेत आहे. त्यामुळे स्थानिक नोंदणीकृत माथाडी कामगारांना काम मिळत नाही. यामुळे राजू यांनी परराज्यातील कामगार कंपनीत काम करत असल्याचा व्हिडीओ चित्रित केला. दरम्यान ही बाब कंपनी मालक मुकेश शरावत यांना कळाली. त्यांनी राजू यांना व्हिडीओ का केला म्हणून मारहाण केली. यावेळी राजू यांनी चित्रित केलेला व्हिडीओ डिलिट करून घेतला. याप्रकरणी राजू यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कंपनी मालक मुकेश शरावत यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

कंपनी मालकाची मारहाण
कंपनी मालकाची मारहाण

उद्योजकांनी केली होती आयुक्तांकडे तक्रार

काही दिवसांपूर्वी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने साबणाचे पाणी पिऊन घेत गुंड आणून मारहाण केली होती. यासंदर्भात उद्योजकांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेतली होती. यावेळी निवेदनात म्हटले होते की उद्योजकांना गुंड प्रवृत्तीचे लोक नियमित धमकावत असून यामुळे उद्योजक त्रस्त आहे. यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी उद्योजकांनी केली होती.

कामगार वर्गात संतप्त प्रतिक्रिया

उद्योजकांना कामगारांनी मारहाण केल्याची घटना ताजी असताना बाहेरील कामगार आणून त्यांच्याकडून कमी पैशात काम करून घेणाऱ्या कामगारांचे चित्रीकरण करणाऱ्या कामगाराला कंपनी भारत आणि बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे कामगार वर्गामध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान कंपनी मालकाच्या मारहाण प्रकरणी उद्योजक संघटना काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.