ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायगावची महाशिवरात्र यात्रा रद्द - महाशिवरात्र यात्रा कायगाव

11 मार्च रोजी महाशिवरात्री आहे कायगाव येथे महाशिवरात्री निमित्त मोठीं यात्रा भरते तालुकभरातून मोठ्या संख्येने भाविक कायगाव येथे प्रभु रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येतात कोरोनाचा पार्श्वभूमी पाहता प्रशासनाने यावर्षी कोरोना संसर्ग व शासनाने जाहीर केलेल्या जमावबंदी आदेशामुळे यात्रा उत्सव साध्या पद्धतीने करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरवले आहे. व तसेच सोशल मीडियावर वृत्तपत्रातून देखील जाहीर करण्यात आले आहे.

kaygaon temple
कायगाव महाशिवरात्र
author img

By

Published : Mar 11, 2021, 9:26 AM IST

औरंगाबाद - आज महाशिवरात्र उत्सव आहे. मात्र शिवरात्रीवर कोरोना विषाणूचे सावट असल्याने बहुतांश ठिकाणची महादेव मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रामेश्वर मंदिर यात्रा उत्सवदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त महादेवाची पूजा अर्चा मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

पालखी मिरवणूकही रद्द
महाशिवरात्री निमित्त कायगावच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्याप्रमाणात असते. मात्र कोरोना विषाणूचे सावट अद्याप कायम असल्याने मंदिर प्रशासाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच 12 मार्च रोजी निघणारी पालखी मिरवणूक देखील रद्द करण्यात आली आहे. याबाबत मंदिर प्रशासनाने पत्रक काढून माहिती जाहीर केली आहे. दर वर्षी हजारो भाविक या उत्सवात सामील होतात मंदिराजवळ असलेल्या गोदावरीत गंगास्नान करून प्रभू रामेश्वराचे दर्शन घेत असतात. परंतु कोरोनाचा वाढता शिरकाव पाहता या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली असुन यात्रा उत्सव साध्या पद्धतीने होणार असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. तरीही भाविकांनी नियम मोडून दर्शनासाठी गर्दी करू नये यासाठीची खबरदारी म्हणून मंदिर प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला आहे.

यात्रा उत्सव साध्या पद्धतीने होणार मंदिर प्रशासणाचा निर्णय

11 मार्च रोजी महाशिवरात्री आहे कायगाव येथे महाशिवरात्री निमित्त मोठीं यात्रा भरते तालुकभरातून मोठ्या संख्येने भाविक कायगाव येथे प्रभु रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येतात कोरोनाचा पार्श्वभूमी पाहता प्रशासनाने यावर्षी कोरोना संसर्ग व शासनाने जाहीर केलेल्या जमावबंदी आदेशामुळे यात्रा उत्सव साध्या पद्धतीने करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरवले आहे. व तसेच सोशल मीडियावर वृत्तपत्रातून देखील जाहीर करण्यात आले आहे. परंतु काही प्रमाणात भाविक येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे यात्रा कमिटीकडून याची विशेष खबरदारी घेतली आहे. परंतु भाविकांनी कुठली गर्दी न करता यात्रेसाठी येण्यास टाळावे, असे आवाहन रामेश्वर मंदिर यात्रा उत्सव समितीचे ज्ञानेश्वर पाटील गायकवाड, भाऊसाहेब गवळी, संतोष बिरुटे, अमोल कान्हे, शिवाजी इष्टके बाळासाहेब नजन, दीपक खाजगे , विजय मोहीम, दादासाहेब भोगे बाळासाहेब सोनवणे, आदींनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.