औरंंगाबाद - उजबेकिस्तानातील ताश्कंद येथे नुकत्याच झालेल्या कॅडेट गटातील आशियाई तलवारबाजी स्पर्धेत ( International Asian Fencing Championships ) औरंगाबादच्या कशीष भराड आणि वैदेही लोहिया दोघींनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना जोरदार कामगिरी करताना कांस्यपदकांची कमाई ( Won Bronze Medals ) केल्यानंतर पदक मिळवत भारतासह औरंगाबादच्या नावात मानाचा तुरा रोवला आहे. स्पर्धेनंंतर शहरात आलेल्या दोघींची विमानतळ ते क्रांती चौक जिपमधून रॅली काढत जल्लोशात स्वागत करण्यात आले.
उजबेकिस्तानातील ताश्कंद येथे २४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान आशियाई स्पर्धेत तलवारबाजी स्पर्धेत ( International Asian Fencing Championships ) औरंगाबादच्या कशीष भराडने मुलींच्या १७ वर्षांखालील वयोगटात सेबर प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत जॉर्डनच्या खेळाडूंवर ४५-२८ अशा गुणफरकाने मात करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत तिला पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला होता. कशीषनंतर वैदेही लोहियाने जबरदस्त कामगिरी करत स्पर्धेत कॅडेट गटात भारताला दुसरे कांस्यपदक जिंकून दिले. वैदेहीने मुलींच्या १७ वर्षाखालील वयोगटांत कझाकिगस्तान आणि इराणच्या खेळाडूंना धूळ चारली. मात्र, उपांत्य फेरीत उजबेकिस्तानच्या खेळाडूविरुद्ध तिला पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. वैदेही व कशिष या दोघी साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तुकाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
ऑलम्पीक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याच स्वप्न - उजबेकिस्तानातील दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा या स्पर्धेसाठी गेल्यानंतर आंतराष्ट्रीय खेळाडूंचे कडवे आवाहन होते. मात्र, उजबेकिस्तानमध्ये आशियाई ज्युनिअर व कॅडेट गटातील तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकणार्या कशिष भराड व वैदेही लोहिया यांचे ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे.
स्पर्धेपुर्वी दोन महिने होता बेडरेस्ट - राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी कशीषच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. यामुळे कशीषला तब्बल दोन महिने बेडरेस्ट घ्यावा लागला. तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने स्पर्धोला जाण्यापूर्वी कशीकच्या मनात धाकधूक होती. मात्र, खचून न जाता पालकांनी व प्रशिक्षकांनी मोठा धिर दिला. यामुळे देशासाठी पदक मिळवायचेच, असे ठरवून स्पर्धेसाठी गेले होते. पुढच्या स्पर्धेसाठी तयारी सुरू असून ऑलम्पीकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची कशीषची इच्छा आहे.
दोघींची आंतराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगीरी - गतवर्षी इजिप्तमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद आणि २०१९ मध्ये जॉर्डन येथे आशियाई स्पर्धेत कॅडेट गटात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. उजबेकिस्तानातील तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. कशिषने राष्ट्रीय स्पर्धेत एकूण १८ पदकं जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. वैदेही लोहियाची २०१९ मध्ये बँकॉक येथे २३ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. उजबेकिस्तानात झालेली वैदेहीची दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. वैदेहीच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत राष्ट्रीय स्पर्धेत ५ सुवर्ण, ८ रौप्य तर २ कांस्य, अशी एकूण १५ पदकांची कमाई केलेली आहे.