औरंगाबाद - कन्नड नगरपरिषदेच्या प्रांगणात आर्सेनिक अल्बम 30 या होमियोपॅथिक गोळ्या नागरिकांना विनामुल्य वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला. या गोळ्यांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार कैलास पाटील, नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभागृह नेते संतोषभाऊ कोल्हे, तालुकाध्यक्ष बबनदादा बनसोड, शहराध्यक्ष अहेमद अली भैय्या, डाॅ.यशवंत पवार, मुख्याधिकारी श्रीमती नंदा गायकवाड व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या सर्व कर्मचार्यांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. नगरपरिषदेने या गोळ्या वाटण्यासाठी 24 टीम तयार केल्या आहे. त्यामध्ये एक कर्मचारी व एक नगरसेवक यांना प्रत्येकी 100 बाॅटल देण्यात आल्या आहेत. एका बाॅटलमध्ये एका कुटुंबाला आवश्यक एवढ्या गोळ्या देण्यात आल्या आहे.
कार्यक्रमानंतर लगेचच जबाबदारी दिलेल्या टीम व नगरसेवक आपापल्या प्रभागात जाऊन गोळ्यांचे वाटप करत आहे.