औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या पक्षांचे स्टार प्रचारक राज्यात तळ ठोकून बसले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार हा औरंगाबाद येथे प्रचारासाठी आला होता. यावेळी त्यांने सावरकर यांना भारतरत्न देण्याची भाषा करणाऱ्या लोकांनी आधी सावरकर पुतळ्याजवळचा रस्ता चांगला करावा असा मिश्कील टोला सरकारला लगावला.
हेही वाचा - हे तर मनुवादी सरकार..; शिवरांयांचा इतिहास वगळण्याच्या प्रकरणावरून आव्हाडांचा घणाघात
कन्हैय्या म्हणाला, आज काल मूळ मुद्द्यांवर निवडणूक होत नाही तर मुद्दे भरकटवले जातात. अशाने कसा विकास होणार? अशी खंत व्यक्त केली. भाजपने सावरकर यांना भारतरत्न देणारं असल्याच्या घोषणेला विकासाचा मुद्दा मांडत कन्हैयाने भाष्य केले.
गेल्या अनेक वर्षांपासून त्याच त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवल्या जात आहे. भाजप फेकू सरकार आहे. हे सरकार जाणूनबुजून असे मुद्दे काढते की, जनतेच्या मूळ प्रश्नाकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. असा आरोप कन्हैयाने यावेळी केला. कन्हैय्या भाकपचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार अभय टाकसाळ यांच्या प्रचार रॅलीसाठी औरंगाबादेत आला होता.
हेही वाचा - 'शरद पवार यांची अवस्था 'शोले' चित्रपटातील जेलरसारखी'
भाकपने 35 सूत्री कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती कन्हैय्या कुमार यांनी सांगितले. 35 सूत्री कार्यक्रमात रस्ते, वीज, पाणी, शिक्षा, आरोग्य असे मुद्दे घेतलेले आहेत. निवडणूक लढवत असताना मतदारांच्या मूळ समस्यांवर चर्चा करून निवडणूक लढवली गेली पाहिजे. जो व्यक्ती मूळ समस्या सोडवण्यावर भर देऊ शकतो अशाच उमेदवाराला निवडून दिले पाहिजे. असे मत कन्हैय्या कुमारने यावेळी व्यक्त केले.