ETV Bharat / state

राजकीय पक्षांनी पीक पाहण्याची नौटंकी करू नये - शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी

शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. नवनिर्वाचित आमदारांच्या या दौऱ्यावर शेतकरी संघटनांनी टीका करत या दौऱ्यांना नौटंकी म्हटलं आहे.

नुकसान
author img

By

Published : Nov 2, 2019, 8:51 PM IST

औरंगाबाद - सध्या सुरु असलेल्या पावसानं मराठवाड्यावर मात्र कृपादृष्टी केली असली तरी या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता युतीच्या आमदारांचे पाहणी दौरे होत आहेत. मात्र, दौरे करुन नौटंकी करू नका, थेट मदत द्या, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

जयाजी सूर्यवंशी

हेही वाचा- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेना-भाजप आमदारांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. नवनिर्वाचित आमदारांच्या या दौऱ्यावर शेतकरी संघटनांनी टीका करत या दौऱ्यांना नौटंकी म्हटलं आहे. परतीच्या पावसामुळे कुठं आनंद तर कुठं दु:खाचं वातावरण झालं आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या सतंतधार पावसानं सोयाबीन, कापूस, बाजरी आणि मका पीक उद्ध्वस्त झालं आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळत आहे. दुष्काळातही पीक शेतकऱ्यांनी पाण्याविनाही हिमतीनं जपलं. मात्र, सध्याच्या पावसानं पिकाचे तीनतेरा झाल्याचं चित्र दिसंत आहे. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात जवळपास 95 टक्के नुकसान शेतकऱ्यांचं झाल्याचं उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे पाहणी दौरे, मोर्चे, पंचनामे करण्याचे नाटक न करता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे बसून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केली आहे.

Intro:सध्या सुरु असलेल्या पावसानं मराठवाड्यावर मात्र कृपादृष्टी केली आहे असली तरी या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता युतीचे आमदारांचे पाहणी दौरे होत आहे. मात्र दौरे करून नौटंकी करू नका थेट मदत द्या अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.Body:औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेना - भाजप आमदारांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. नवनिर्वाचित आमदारांच्या या दौर्यावर शेतकरी संघटनांनी टीका करत या दौऱ्यांना नौटंकी म्हणलं आहे. Conclusion:परतीच्या पावसामुळे कुठं आनंद तर कुठं दुखाचंही वातावरण झालंय. गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या सतंतधार पावसानं सोयाबिन, कापूस, बाजरी आणि मका पिक उद्धव्सत झालं आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील बहुतांश हेच चित्र पाहायला मिळत आहे. दुष्काळामुळं पिक शेतक-यांनी पाण्याविनाही हिमतीनं जपलं. मात्र सध्याच्या या पावसानं पिकाचे तिनतेरा झाल्याचं चित्र दिसंतय. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात जवळपास 95 टक्के नुकसान शेतकऱ्यांचं झाल्याचं घडपणे दिसून येत आहे. त्यामुळे पाहणी दौरे, मोर्चे, पंचनामे करण्याची नाटक न करता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे बसून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केली आहे.

बाईट.. जयाजी सूर्यवंशी - शेतकरी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.