औरंगाबाद - हमीभाव आणि शेतमालाची आयात बंद केल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, असे मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - विश्व हिंदू महासभेच्या उत्तर प्रदेश अध्यक्षांची गोळी घालून हत्या
सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत उपाययोजना आणि झिरो बजेट शेती चांगली असली तरी शेतकऱ्यांना पूरक नाही, असेही सूर्यवंशी म्हणाले. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी निर्यात धोरण ठरवण्यात आलेले नाही. हमीभाव, शेतमालावर प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षणासंदर्भातील योजनांचा यात अभाव असल्याचे मत त्यांनी यावेळी नोंदवले. कांदा, तुरीचे प्रश्न प्रलंबित असल्याने हा अर्थसंकल्प म्हणावा तसा फायदेशीर वाटत नाही, अशी प्रतिक्रियाही सूर्यवंशी यांनी दिली.
हेही वाचा - शाहीन बाग हिंसा : 'भाजपच म्हणणं गोळीबार करणाऱ्या तरुणाने अधोरेखीत केलं'