औरंगांबाद - तिहेरी तलाक कायद्याला विरोध करीत हा कायदा फक्त मुस्लिम युवकांना तुरुंगामध्ये टाकण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप जमाते इस्लामी हिंदच्या वतीने करण्यात आला आहे. तलाक दिलेल्या महिलेचा ३ वर्षांचा खर्च, तिच्या स्वरक्षणाची जबाबदारी कोण उचलणार? असा प्रश्नही जमाते इस्लामी हिंद उत्तर विभागाच्या महिला अध्यक्ष शाईस्ता कादरी यांनी विचारला आहे.
इतर सर्व जाती धर्म सोडून सरकार मुस्लिमांच्या मागे लागले आहे. मुस्लिमांना बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे कादरी म्हणाल्या. तसेच तरुंगातून शिक्षा भोगून आल्यावर पतीचा पत्नी बरोबर व्यवहार कसा राहिल हा प्रश्न आहे. त्यामुळे कोणतीही मुस्लिम महिला हा कायदा मान्य करणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
तिहेरी तलाकवर औरंगाबाद शहरातील मुस्लिम महिलांनी विरोध दर्शविला असून हा करार फक्त मुस्लिम युवकांना तुरुंगात डांबण्यासाठीच केला जात आहे. सरकारने तलाक दिलेल्या मुस्लिम युवकाला ३ वर्षाची शिक्षा देण्याचा कायदा अन्यायकारक आहे. हा मुद्दा हाती घेऊन सरकार मुस्लिम समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या.