औरंगाबाद - शरद पवार यांनी निरश आणि हाताश झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असल्याचा टोला भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी औरंगाबादेत लगावला आहे. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षावर ईडीची चौकशी चालू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यामुळेच अशी टिका केली असल्याचे जे.पी. नड्डा म्हणाले. फुलंब्री मतदारसंघाचे भाजप उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सिडको येथे आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते.
राहुल गांधी काश्मीर प्रकरणी जे वक्तव्य करत आहेत त्याचाच फायदा घेत पाकिस्तान हा मुद्दा अंतरराष्ट्रीय स्तरावर नेत आहे. राहुल गांधी एकप्रकारे पाकिस्तानची वकिली करत असल्याचा आरेपही नड्डा यांनी केला आहे. या प्रचार सभेत नड्डा यांनी जेल आणि ईडीच्या चकरा मारणारे लोक राज्याला प्रगतीकडे नेऊ शकत नाही, असे म्हणत विरोधकांवर जोरदार टिकास्त्र सोडले. ही निवडणुक केवळ सरकार स्थापनेसाठी लढवत नसून महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाण्याचा उद्देशाने लढवत आहोत, असेही नड्डा म्हणाले.
हेही वाचा - विठ्ठला कोणता हा झेंडा घेऊ हाती! पैठण तालुक्यात अनेक नाराज कार्यकर्त्यांचे पक्षांतर
कॉंग्रेसच्या सरकारमध्ये दर एक ते दोन वर्षाला मुख्यमंत्री बदलला जात होता. फक्त संगीत खुर्ची खेळ खेळला गेला. भाजपच्या सरकारच्या देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे पुर्ण केली, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला.
तुम्ही कशाचा धाक दाखवून पक्षांतर करवून घेतले होते - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे
काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये असवस्थना निर्माण झाली आहे. पक्ष सोडून भाजप मध्ये येणाऱ्यांची लाईन लागली आहे. त्यांच्या नेतृत्वाच्या मते भाजप कार्यकर्त्यांना ईडीचा धाक दाखवून पक्षांतर करवून घेत आहे. मात्र राष्ट्रवादीनेही सर्व पक्षांतून कार्यकर्ते फोडूनच पक्ष तयार केला आहे. तुम्ही कुणाचा धाक दाखवून पक्षांतर करवून घेतले होते, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांना केला आहे. ईडी काय कोणतीही नोटिस आली तरी त्याला तोंड दिले पाहीजे. परंतु, नोटिस येताच घाबरून जाणे आणि भाजपवर आरोप करणे हा कमकुवतपणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहे, असा टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला आहे.