औरंगाबाद - येथील प्रसिद्ध तबला वादक शरद दांडगे यांना मानाचा इन्फिनिटी पुरस्कार जाहीर करण्यात आला. तबल्याच्या माध्यमातून शरद दांडगे भारताच्या विविध भागातील संगीताची झलक सादर करतात. त्यांच्या या कलेचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
दांडगे हे कला क्षेत्रात काम करणारे प्रसिद्ध व्यक्ती असून त्यांच्या 'ओम पंच नाद'च्या माध्यमातून ते आपली कला लोकांपर्यत पोहोचवत आहेत. त्यांच्या कलेची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे.
भारत विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याच्या संगीतात देखील वैविध्य आहे. संगीत वेगळे असले तरी प्रत्येक भागातील संस्कृतीचे दर्शन वाद्याच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न प्रसिद्ध तबलावादक शरद दांडगे यांनी केला. एकावेळी आठ तबले आणि एका ढोलकीच्या सहाय्याने ते वादन करतात.
हेही वाचा - 'ब्रिटीश राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स 71 वा वाढदिवस भारतात साजरा करणार'
शरद लांडगे महाराष्ट्राची ढोलकी, पखवाज, मृदुंग, तबला, बिहारी ढोलक, पश्चिम बंगाल ढोल, खंजिरी, डफ, संबळ, बिहू ढोल, केरळी चंदा, राजस्थानी नगारा, बेस ड्रम, ताशा, ओडिसी मर्दळ अशा सर्व वाद्यांचा आवाज तबल्यातून काढतात.