ETV Bharat / state

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुन्हा न्यायालयात

त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यात संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता. परंतु आता पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ
इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ
author img

By

Published : May 7, 2021, 10:14 PM IST

औरंगाबाद - कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अडचणीत वाढ झाल्याच दिसतय. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यात संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता. परंतु आता पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

इंदोरीकर महाराजांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कीर्तनात 'सम तिथीला स्त्रीसंग झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर यांना दिलासा देत खटला रद्द केला होता.

आता या आदेशाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील यांनी इंदोरीकर महाराज यांच्यासह सरकारी पक्षासही प्रतिवादी केले आहे. पुढील सुनावणी २९ जून २०२१ रोजी होणार आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्या ॲड. रंदना गवांदे यांच्यातर्फे ॲड. नेहा कांबळे, ॲड. जितेंद्र पाटील काम पाहत आहेत.

हेही वाचा- मराठा आरक्षण : गरज पडल्यास एक दिवसीय अधिवेशन घेऊ - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.