ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात वाढल्या कानाच्या समस्या, काजळी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला - औरंगाबाद जिल्हा लेटेस्ट न्यूज

लॉकडाऊनमध्ये वर्कफ्रॉम होमची संकल्पना अस्तित्वात आली. घरी बसून आपलं काम करणं सोपं झालं. सतत हेडफोन लावून काम करण्याची पद्धत अवलंबली जाऊ लागली. मात्र त्यामुळेच एक नवी समस्या उद्भवली, ती म्हणजे बहिरेपणाची.

लॉकडाऊन काळात वाढल्या कानाच्या समस्या
लॉकडाऊन काळात वाढल्या कानाच्या समस्या
author img

By

Published : Mar 5, 2021, 2:31 AM IST

औरंगाबाद - लॉकडाऊनमध्ये वर्कफ्रॉम होमची संकल्पना अस्तित्वात आली. घरी बसून आपलं काम करणं सोपं झालं. सतत हेडफोन लावून काम करण्याची पद्धत अवलंबली जाऊ लागली. मात्र त्यामुळेच एक नवी समस्या उद्भवली, ती म्हणजे बहिरेपणाची. तज्ञांच्या माहिती नुसार युवकांमध्ये बहिरेपणा वाढत चालला असून, ही धोक्याची घंटा असून वेळीच खबरदारी घेतली पाहिजे असा सल्ला तज्ञांनी दिलाय.

वर्षभरात वाढला स्क्रिन टाइम

मागील एक वर्षापासून लॉकडाऊनच्या, काळामध्ये प्रत्येकाचा मोबाईल वापरण्याचा वेळ वाढला आहे. सतत मोबाईलच्या स्क्रीनची खेळत राहणे, वेगवेगळ्या पद्धतीचे गाणे, ऑनलाइन सेशन, मोबाईल व्हिडिओ पाहण्याचा वेळ वाढला आहे. हे करत असताना सतत हेडफोन लावणे आणि त्या माध्यमातून मोठ्या आवाजात गाणी आणि व्हिडिओ यांचा आवाज ऐकणे. त्यामुळे कानांवर येणारा ताण हा वाढतच चालला आहे. लहान मुलांपासून ते युवकांपर्यंत सर्वच कानाच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. सतत हेडफोन वापरल्याने झोप न आल्याने चिडचिडेपणा वाढत आहे. कानाच्या समस्येसाठी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

लॉकडाऊन काळात वाढल्या कानाच्या समस्या

कानाची निगा राखण्यासाठी वापरा 60 - 60 फॉर्म्युला

गेल्या काही महिन्यांपासून हेडफोन आणि एअर बड्सचा अतिवापर करण्यात येत आहे. सतत वापरण्यात येणाऱ्या हेडफोनमुळे बहिरेपणा येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कानाची निगा राखणे गरजेचे आहे. त्यासाठी 60-60 चा फॉर्म्युला असणे गरजेचे असल्याचं मत कानाचे तज्ज्ञ डॉ. रमेश रोहिवाल यांनी व्यक्त केलं. म्हणजे मोबाईल आवाज क्षमता 60 टक्के ठेवावी आणि जास्तीतजास्त 60 मिनिटं हेडफोन वापरावा. हा फॉर्म्युला वापरला तर कानाचे आजार आपण टाळू शकतो अस मत डॉ. रमेश रोहिवाल यांनी व्यक्त केलं आहे.

मूकबधिर मुलांची काळजी घ्यावी

लहान मुलं जन्मताच त्यांची ऐकण्याची क्षमता तपासणे गरजेचे झालेले आहे. त्यासाठी OAE नावाची एक पद्धती आहे ज्यामध्ये लहान बाळाला ऐकू येतं का नाही याची तपासणी करता येते. विशेष म्हणजे मूकबधिर मुलांचे प्रमाण ही चिंतेची बाब असते. लवकर निदान झालं तर त्याच्यावर तातडीने उपचार करता येतात. वेळीच इनप्लांट करून बहिरेपणा दूर करता येतो. मात्र त्यासाठी आठ ते नऊ लाखांचा खर्च होतो. त्यासाठी EDIP च्या माध्यमातून सरकार आर्थिक मदत देत असते. त्यासाठी अर्थसाह्य वाढवण्याची देखील गरज निर्माण झाली आहे. वेळीच उपचार झाले तर, मुले मोठी झाल्यानंतर त्यांना कुठलाच कमीपणा जाणवणार नाही. त्यामुळे वेळीच रोगनिदान होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. रमेश रोहिवाल यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.