औरंगाबाद- काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने खाटांची उलब्धता वाढवावी, अन्यथा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील रुग्णालयांंना दिला आहे.
तातडीने खाटा वाढवण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. ऑक्टोबर (२०२०) महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यात ३५२० खाटा कोवीड रुग्णासांठी राखीव ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी १५४६ खाटांवर सध्या कोविड रुग्ण उपचार घेत आहेत.काही महिन्यांपूर्वी कोविडचा प्रभाव कमी झाल्याने उर्वरित १९७४ खाटांवर नॉन कोविड रुग्ण उपचार घेत असल्याचे आढळले आहे. ह्या उर्वरित खाटा देखील संबंधित रुग्णालयांनी लवकरात लवकर कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहे.
..तर रुग्णालयांवर कारवाई
विभागीय आयुक्तांनी निर्देश देऊनही काही रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकचे बेड वाढवण्यात अनास्था दाखवली. धुत रुग्णालयाला १५० खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ ८७ खाटा वाढविले. हेडगेवार रुग्णालयाला २०० खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ ७२ खाटा वाढविले. तर बजाज रुग्णालयाला १५० खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ ५० खाटा वाढविले. तसेच इतरही रुग्णालयांना निर्देश दिले होते. मात्र खाटा न वाढविल्याने या रुग्णालयांना साथरोग अधिनियम १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन २००५ अन्वये नोटीस देण्यात आले आहे. उर्वरित खाटा येत्या तीन दिवसांत वाढविण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे. तर एमजीएम रुग्णालयाला २०० तर घाटीला ५०८ खाटा वाढविण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी यावेळी दिले आहे. वाढीव खाटा उपलब्ध न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सुनील केंद्रेकर यांनी दिला.
या रुग्णालयांनी वाढवल्या खाटा
विभागीय आयुक्तांनी यावेळी उदिष्टापेक्षा अधिक प्रमाणात काही रुग्णालयांची खाटांची उपलब्धता केली आहे. कृष्णा रुग्णालयाने ५० खाटांचे उद्दिष्ट्य दिलले असताना ६१ खाटा वाढविल्या. लाईफ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाने २९ खाटांचे उद्दिष्ट्य दिलेले असताना ४२ खाटा वाढविल्या. तर एशियन सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने ८० चे उद्दिष्ट्य दिलेले असतना अधिकच्या ५० वाढविले आहे.
हेही वाचा-कोरोना स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना; टाळेबंदीला नागरिकांचा विरोध