ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

author img

By

Published : May 25, 2019, 3:29 PM IST

मृत दीपक शिंदे

औरंगाबाद - औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

दीपक सोमीलाल शिंदे (वय 30 वर्षे, रा. अघोरी, ता. वैजापुर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुनील जनार्धन वाकळे (वय 35 वर्षे, रा. गवळीधानोरा, ता. गंगापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घाटी रूग्णालयातील दृश्य

दीपक शिंदे हा रांजणगाव परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत होता. एक दिवसाची सुट्टी असल्यामुळे तो आई-वडिलांना भेटण्यासाठी अघोर येथे दुचाकी क्रमांक (एम एच 20, 3701) वरून गावाकडे गेला होता. नातेवाईकांना भेटून रांजणगावकडे येत असताना खोजेवाडी फाट्यावर समोरून आलेल्या दुचाकीसोबत अपघात झाला. अपघातात दीपकचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्याला कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी दीपकला तपासून मृत घोषित केले तर सुनीलवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार के.बी. देवरे हे करीत आहेत.

Intro:औरंगाबाद- मुंबई महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन अपघातात एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.
दीपक सोमीलाल शिंदे (वय 30 वर्षे) रा. अघोरी, ता. वैजापुर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुनील जनार्धन वाकळे (वय 35 वर्षे) रा. गवळीधानोरा, गंगापूर अशी जखमी चे नाव आहे. त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Body: दीपक शिंदे हा रांजणगाव परिसरातील एका खाजगी कंपनीत काम करत होता. एक दिवसाची सुट्टी असल्यामुळे तो आई-वडिलांना भेटण्यासाठी अघोर येथे दुचाकी क्रमांक (एम एच 20, 3701) वरून गावाकडे गेला होता. नातेवाईकांना भेटून रांजणगावकडे येत असताना खोजेवाडी फाट्यावर समोरून आलेल्या दुचाकी सोबत अपघात झाला. अपघातात दीपक चा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती एमायडीसीवाळूज पोलिस ठाण्याला कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ह जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी दीपकला तपासून मृत घोषित केले तर सुनील वर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार के.बी. देवरे हे करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.