मुसतान PAK vs ENG 1st Test : मुलतानमध्ये शुक्रवारी यजमान पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव करुन इंग्लंडनं इतिहास रचला. पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करुनही एखाद्या संघाला डावाच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागण्याची कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्ताननं पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात त्यांना केवळ 220 धावा करता आल्या. दुसरीकडं, इंग्लंड संघानं 823 धावांवर 7 गडी गमावून पहिला डाव घोषित केला. दोन डावात फलंदाजी करुनही पाकिस्तान संघाला ही धावसंख्या गाठता आली नाही आणि मालिकेत 1-0 अशी पिछाडी झाली. या पराभवासह पाकिस्तान क्रिकेटच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही जमा झाला आहे. 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणत्याही संघाला असा पराभवाचा सामना करावा लागला नाही.
The first team in Test history to concede over 500 in the first innings, and end up winning by an innings...
— England Cricket (@englandcricket) October 11, 2024
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/N2Ey1dCYVL
पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वात लाजिरवाणा दिवस : या सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तान संघानं 556 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत त्यांनी सामन्याची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीनं केली. सामन्याचे पहिले साडेतीन दिवस सामना अनिर्णितेच्या दिशेनं जात होता, मात्र चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापासून सामन्यानं असं वळण घेतलं की, पाकिस्तानला एक डाव आणि 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आम्ही तुम्हाला सांगतो, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, पहिल्या डावात 500 हून अधिक धावा केल्यानंतरही एखाद्या संघानं कसोटी सामना एका डावानं गमावला आहे.
Magic in Multan! 🙌
— England Cricket (@englandcricket) October 11, 2024
A famous, famous win! 🦁
Match Centre: https://t.co/M5mJLlHALN
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/lKM6NWzH2A
इंग्लंड संघाची दमदार कामगिरी : 556 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं 150 षटकांत 823 धावांचा हिमालय उभा करत करत पहिला डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लंडने पहिल्या डावात 267 धावांची आघाडी घेतली. पण या सपाट खेळपट्टीवर पाकिस्तानचा दुसरा डाव केवळ 220 धावांवर आटोपला, त्यामुळं त्यांना डावानं पराभवाला सामोरं जावं लागलं. खेळाच्या शेवटच्या दिवशी पाकिस्ताननं 152 धावांच्या पुढं खेळायला सुरुवात केली आणि त्यांच्या हातात 4 विकेट शिल्लक होत्या. पण पाकिस्तान संघ पाचव्या दिवशी मैदानावर एक सत्रही टिकू शकला नाही.
New numbers for you to memorise, and new possibilities shown by England 🏏
— ICC (@ICC) October 11, 2024
All the headlines and records in a stunning display of Test cricket 👇#PAKvENG | #WTC25https://t.co/sTkBTuC0VA
जो रुट आणि हॅरी ब्रूक इंग्लंडच्या विजयाचे नायक : या सामन्यात जो रुट आणि हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. जो रूटने पहिल्या डावात 262 धावा केल्या, तर हॅरी ब्रूकनं त्रिशतक झळकावत 317 धावा केल्या. तसंच तो इंग्लंडसाठी सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा फलंदाज ठरला. दुसरीकडे, दोन्ही खेळाडूंमध्ये 454 धावांची विक्रमी भागीदारी झाली, जी इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली.
THE HISTORIC MOMENT....!!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2024
- England becomes the first team to win a Test match by an innings after conceding more than 500 runs in the first innings. 🤯👏pic.twitter.com/7Irp3QMI6z
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करुनही सामना गमावलेले संघ :
संघ | निकाल | विजयाचं अंतर | टॉस | विरोधी संघ | मैदान | सामना सुरु झाल्याची दिनांक |
ऑस्ट्रेलिया | पराभूत | 10 धावा | जिंकला | इंग्लंड | सिडनी | 14 डिसेंबर 1894 |
इंग्लंड | पराभूत | 5 विकेट | जिंकला | ऑस्ट्रेलिया | मेलबर्न | 8 मार्च 1929 |
ऑस्ट्रेलिया | पराभूत | 6 विकेट | जिंकला | दक्षिण आफ्रीका | मेलबर्न | 6 फेब्रुवारी 1953 |
वेस्ट इंडीज | पराभूत | 7 विकेट | जिंकला | इंग्लंड | पोर्ट ऑफ स्पेन | 14 मार्च 1968 |
ऑस्ट्रेलिया | पराभूत | 4 विकेट | जिंकला | भारत | एडिलेड | 12 डिसेंबर 2003 |
इंग्लंड | पराभूत | 6 विकेट | जिंकला | ऑस्ट्रेलिया | एडिलेड | 1 डिसेंबर 2006 |
बांगलादेश | पराभूत | 7 विकेट | जिंकला | न्यूझीलंड | वेलिंगटन | 12 जानेवारी 2017 |
न्यूझीलंड | पराभूत | 5 विकेट | जिंकला | इंग्लंड | नॉटिंघम | 10 जून 2022 |
पाकिस्तान | पराभूत | डाव आणि 47 धावा | जिंकला | इंग्लंड | मुलतान | 07 ऑक्टोबर 2024 |
पराभूत कसोटीत संघाकडून एका डावात सर्वाधिक शतकं :
- 3 - श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलंबो, 1992
- 3 - पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, रावळपिंडी, 2022
- 3 - पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, मुलतान, 2024*
🚨 HISTORY CREATED IN MULTAN. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2024
- Pakistan becomes the first team to lose a Test match by an innings even after scoring 500-plus in the first inning. pic.twitter.com/TYNo67rYOW
पहिल्या डावात 500 हून अधिक धावा केल्यानंतर सर्वाधिक पराभव :
- 5 - पाकिस्तान*
- 3 - ऑस्ट्रेलिया
- 2 - इंग्लंड
- 2 - न्यूझीलंड
- 2 - बांगलादेश
- - कसोटीच्या पहिल्या डावात 500 हून अधिक धावा देऊनही इंग्लंडचा हा 9वा विजय आहे. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे ज्यांनी सहा विजयांची नोंद केली आहे.
The many milestones of Multan 😍
— England Cricket (@englandcricket) October 11, 2024
Rewriting the history books 📝@IGcom | #EnglandCricket pic.twitter.com/GIFLZvgAlI
घरच्या मैदानावर पाकिस्तानचा कसोटी सामन्यातील सर्वात मोठा पराभव :
- 1959 मध्ये लाहोरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एक डाव आणि 156 धावा
- 2004 मध्ये रावळपिंडीत भारताविरुद्ध एक डाव आणि 131 धावा
- 2008 मध्ये रावळपिंडीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 99 धावा
- 2004 मध्ये मुलतानमध्ये भारताविरुद्ध एक डाव आणि 52 धावा
- 2024 मध्ये मुलतानमध्ये इंग्लंडविरुद्ध एक डाव आणि 47 धावा
हेही वाचा :