ETV Bharat / state

सेनेच्या आव्हानाला एमआयएमचे जाहीरनाम्यातून उत्तर, खैरेंना २० वर्षातील कामे दाखवण्याचे आव्हान

इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला.

author img

By

Published : Apr 21, 2019, 8:26 PM IST

सेनेच्या आव्हानाला एमआयएमचे जाहीरनाम्यातून उत्तर, खैरेंना २० वर्षातील कामे दाखवण्याचे आव्हान

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी केलेली ५ तरी कामे दाखवावे, असे आव्हान शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. या आव्हानाला आज (रविवारी) जलील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेली कामे जाहीरनाम्यातून प्रसिद्ध केली आहेत. तर त्यांनी शिवसेनेला हे माझे उत्तर असून आता खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांची कामे दाखवावी, असे आव्हान केले आहे.

आमदार इम्तियाज जलील वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार आहेत. खासदार खैरे यांनी जिल्ह्याचा काहीच विकास केला नाही, अशी टीका जलील यांनी यापूर्वी केली आहे. या टीकेला औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत, जलील यांनी त्यांच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात ५ तरी कामे केली आहेत का? असा प्रश्न करत त्यांनी त्यांची ५ कामे दाखवावी. आम्ही १० कामे दाखवू, असे आव्हान केले होते.

शिवसेनेच्या या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून आज जलील यांनी अलंकार सभागृहामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये त्यांनी साडेचार वर्षात आमदार असताना केलेल्या कामांचा उल्लेख केला. तसेच जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामाच शिवसेनेच्या आव्हानाला आमचे उत्तर आहे. मी केलेले काम लिखित स्वरूपात जाहीरनाम्यात मांडले आहे. आता चंद्रकांत खैरे यांनी २० वर्षात केलेली कामे दाखवावी व लिखित स्वरूपात ते जाहीर करावे, असे प्रतिआव्हान जलील यांनी शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे शिवसेना आता यावर काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असलेले इमतियाज जलील यांनी केलेले पाच तरी काम दाखवावे असे आव्हान शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते याच आव्हानाला आज जलील यांनी पत्रकार परिषद घेत केलेले काम जाहीरनाम्यातून प्रसिद्ध केले हा माझा शिवसेनेला उत्तर असून खासदार चंद्रकांत खैरे यांनी आता त्यांची कामे दाखवावी असे प्रतिआव्हान शिवसेनेला केला आहे

Body:आमदार इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडी कडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी खासदार खैरे यांनी जिल्ह्याचा काहीच विकास केला नाही अशी टीका केली होती या टीकेला औरंगाबाद पश्चिम चे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत आमदार जलील यांनी त्यांच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात पाच करी काम केले आहेत का असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी त्यांची पाच कामे दाखवावी आम्ही दहा कामे दाखवू असे आव्हान केले होते शिवसेनेच्या याच आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून आज जमील यांनी अलंकार सभागृह मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी साडे चार वर्षात आमदार असताना केलेल्या कामांचा उल्लेख केला व हाच उल्लेख असलेला जाहीरनामा प्रसिद्ध केला हा जाहीरनामा शिवसेनेच्या आव्हानाला उत्तर आहे आम्ही केलेले काम मी लिखित स्वरूपात माझ्या जाहीरनाम्यात मांडले आहे आकाश शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी वीस वर्षात केलेल्या काम त्यांनी दाखवावे व लिखित स्वरूपात ते जाहीर करावे असे प्रतिआव्हान जलील यांनी शिवसेनेला दिले आहे शिवसेना यावर काय भूमिका घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे

Conclusion:शिवसेनेच्या आव्हानाला उत्तर दिल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रचारात व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.