ETV Bharat / state

IATO Conference : राज्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या 38 राष्ट्रीय परिषदेला सुरुवात, पर्यटनमंत्र्यांनी फिरविली पाठ - इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स

38th Aito Conference : 29 सप्टेंबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे तीन दिवसीय 38 वी आयटो परिषद घेण्यात येत आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभाग, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्यानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

38th Aito Conference
38th Aito Conference
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 11:07 PM IST

अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर 38th Aito Conference : इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स अर्थात आयटोची 38 वी परिषद छत्रपती संभाजीनगर येथे सुरुवात झालीय. राज्य सरकारच्या पर्यटन विभाग, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्यानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशभरातील पर्यटन व्यवसायाशी संबंधित 1 हजार पेक्षा अधिक संस्थांचे प्रतिनिधी शहरात दाखल झाले. राज्य सरकारच्या वतीनं या परिषदेचं यजमानपद जिल्ह्याला मिळालं. राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या परिषदेला, मात्र राजकीय अनास्था दिसून आली. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पर्यटन मंत्र्यांनी देखील पाठ फिरवली. मात्र ते पुढील दोन दिवसात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितलं.

दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर शहरात परिषद : राज्य सरकारच्या वतीनं इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स या भारतातील पर्यटन क्षेत्रातील अत्यंत अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या माध्यमातून परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 29 सप्टेंबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे तीन दिवसीय 38 वी आयटो परिषद घेण्यात येत आहे. या तीन दिवसीय परिषदेमध्ये देशभरातून पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या संस्थांचे भागधारक, प्रतिनिधी आले आहेत. दोन वर्षांपासून जिल्ह्यासह राज्यातील व्यावसायिक ही परिषद शहरात व्हावी, याकरिता प्रयत्न करत होते. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीनं या परिषदेचं यजमानपद घेण्यात आलं. या परिषदेत आलेले व्यावसायिक देश विदेशात जाऊन राज्यातील पर्यटनस्थळ, इतर प्रेक्षणीय स्थळाबाबत प्रचार करणार आहेत. त्यामुळं राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाची परिषद मानली जात असून मागील तीन महिन्यापासून त्याबाबत जय्यत तयारी करण्यात येत होती.

तीन दिवस होणार मंथन : विविध राज्यातील पर्यटन विभागाचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स म्हणजेच आयटोच्या या तीन दिवसीय परिषदेमध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये असणारी संधी, त्यासाठी लागणारी साधन संपत्ती, पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, टूर ऑपरेटरचं बदलतं तंत्रज्ञान, क्रूज टुरिझमचे नवीन विश्व, संपर्क जाळ्याचे नवीन आयाम, तसंच पर्यटनासाठी अत्यंत उत्कृष्ट ठिकाण म्हणून पुढे येणारे महाराष्ट्र राज्य अशा विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन होणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी इंडिया ट्रॅव्हल मार्ट या प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आलं. यामध्ये सहभागी राज्यांना त्यांच्या पर्यटन स्थळांची प्रसिद्धी तसेच उपस्थित राहणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांशी परस्पर संवाद साधण्यास संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पर्यटन वाढीसाठी उपाययोजना : शहराचे नाव आता बदलले आहे. कुठल्याही राज्यात सत्ताधारी मंत्री, विरोधीपक्ष नेता एकाच मंचावर येत नाही. आमच्यात मतभेद असतील मात्र, महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र येतो. एकेकाळी देशी वेदेशी पर्यटन चार पाच दिवस शहरात असायचे. मात्र आता तसे होत नाहीये. संभाजीनगर शहर ऐतिहासिक दृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्याबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या. मात्र आमच्याकडं रेल्वे, विमानसेवा आहे. इतकंच नाही तर रस्ते पण चांगले आहेत. राज्यात कोणते पर्यटनस्थळ चांगले आहे, असं विचारल्यावर संभाजीनगर जिल्ह्याचं नाव पहिल्या क्रमांकावर सांगा अशी विनंती अंबादास दानवे यांनी केली. तर विमान उड्डाण वाढवले पाहिजे. उडाण योजनेत जिल्ह्याचे विमानतळ आलं पाहिजे, अशी विनंती दानवे यांनी केली. तर राज्य सरकार पर्यटन वाढीसाठी उपाययोजना करत असल्याचं पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. India Alliance 4th meeting: इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीच्या ठिकाणावरून मतभेद, काँग्रेसचा मात्र इन्कार
  2. MH gov first meeting on OBC : ओबीसी आरक्षणाच्या 'त्या' प्रश्नावरून अजित पवार - छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी?
  3. AAP will Not leave INDIA Alliance : आम आदमी पार्टी INDIA साठी वचनबद्ध - केजरीवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.