ETV Bharat / state

नामांतर वाद : असा आहे औरंगाबाद शहराचा नाव बदलण्याचा इतिहास - औरंगाबाद नामांतरण वाद न्यूज

इ.स पूर्व काळापासून औरंगाबाद शहराचं नाव राजतलक होत. त्यानंतर खडकी नाव पडले अस बोललं जात असलं तरी त्यामध्ये काहीकाळ शहराचं नाव जौनाबाजार असल्याचेही सांगण्यात येते. जौना खान हे मोहम्मद तुगलक याच नाव होतं. दिल्लीची राजधानी दौलताबाद येथे हलवण्याचा हालचाली होत असताना तुगलक जात असताना त्याने बाजारपेठ तयार केली होती.

नामांतर वाद : असा आहे औरंगाबाद शहराचा नाव बदलण्याचा इतिहास
असा आहे औरंगाबाद शहराचा नाव बदलण्याचा इतिहास
author img

By

Published : Jan 3, 2021, 9:03 AM IST

Updated : Jan 3, 2021, 1:56 PM IST

औरंगाबाद - ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या नावालाही एक वेगळाच इतिहास आहे. सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन चांगलचं राजकारण तापत आहे. मात्र, यापूर्वी ५ वेळा औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यात आले असल्याचे इतिहास तज्ञ सांगतात.

नामांतर वाद : असा आहे औरंगाबाद शहराचा नाव बदलण्याचा इतिहास
इ.स पूर्व काळापासून औरंगाबाद शहराला इतिहास आहे. सध्याच्या औरंगाबाद लेणीला नाव देखील नव्हते त्याकाळी कान्हेरीच्या लेणीत शहराचा उल्लेख होता. सुरुवातीला 'राजतलक' अस नाव आलेला हा भाग व्यापारासाठी परिचित होता. इथे कापसाचे शेती आणि व्यापार केला जात असे. आलेला कापूस पैठणला पाठवला जायचा. त्यातून कपड्याची निर्मिती केली जायची. त्यानंतर सध्याच्या औरंगाबादची मूळ स्थापना करणारा मलिक अंबरने शहराला खडकी नाव दिले. मात्र, हे नाव कसे आणि कधी पडले याबाबत स्पष्ट उल्लेख कुठेही नाही. मात्र १६ व्या शतकात खडकी नावाचा उल्लेख आहे, अशी माहिती इतिहासतज्ञ दुलारी कुरेशी यांनी दिली. राजतलक ते औरंगाबाद पाच वेळा बदलले गेले नाव...इ.स पूर्व काळापासून औरंगाबाद शहराचं नाव राजतलक होत. त्यानंतर खडकी नाव पडले अस बोलल जात असल तरी त्यामध्ये काहीकाळ शहराचं नाव जौनाबाजार असल्याचेही सांगण्यात येते. जौना खान हे मोहम्मद तुगलक याच नाव होतं. दिल्लीची राजधानी दौलताबाद येथे हलवण्याचा हालचाली होत असताना तुगलक जात असताना त्याने बाजारपेठ तयार केली होती. जिथे व्यापार केला जायचा. त्याने तिथे मोठ्या विहिरी आणि हौद तयार केले होते. त्यालाच आज जुना बाजार म्हणून ओळखले जात. त्यानंतर खडकी नाव पडलं असा देखील इतिहासात काही ठिकाणी उल्लेख आहे. खडकावर वसलेलं शहर म्हणजे खडकी. त्यानंतर औरंगजेब आला आणि त्यांने शहराला खुजीस्ता बुनियाद अस नाव दिले. कालांतराने औरंगजेबाच्या नावावरून शहराला औरंगाबाद हे नाव मिळालं. जे आजही कायम आहे. त्यानंतर निजामांनी देखील औरंगाबद शहराचे नाव बदललं नाही अशी महिती इतिहास तज्ञ रफत कुरेशी यांनी दिली.औरंगजेबाने केला शहराचा विस्तार... औरंगजेबाचे नाव शहराला मिळाले कारण शहराचा विस्तार करण्यात त्याचा खूप मोठा वाटा होता. औरंगजेब आल्यावर त्याने बाहेरून लोक बोलावली. त्यात राजपूत लोकांचा मोठा सहभाग होता. त्या लोकांना त्याने वतन वाटून दिली. त्या भागात आजही त्या राजपूत सरकारांची नाव कायम आहेत. ज्यामध्ये भावसिंगपुरा, फत्तेसिंगपुरा अशा भागांचा समावेश आहे. या सरदारांमुळे शहर मोठं करण्यात मदत झाली. त्यानंतर शहराची सुरक्षा लक्षात घेत त्याने शहराच्या सीमेवर ५२ दरवाजे उभारले. हे दरवाजे रात्री बंद होत असे, आणि सकाळीच उघडत असे. रात्री कोणी आलं तर त्याला रात्रभर गेटच्या बाहेर राहावं लागतं होत. शहराच्या उभारणीत औरंगजेबाचा मोठा वाटा असल्याने शहराला औरंगाबाद नाव देण्यात आले. आणि ते आजही कायम आहे. असे मत इतिहासतज्ञ रफत कुरेशी यांनी व्यक्त केलं.

Last Updated : Jan 3, 2021, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.