औरंगाबाद : लव्ह जिहाद (Love Jihad Aurangabad) प्रकरणात अनेक मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींना लग्नासाठी मुस्लिम बनवले असे आरोप प्रत्यारोप आपण पाहिले; मात्र औरंगाबादेत एक वेगळेच प्रकरण पुढ आले आहे. यामध्ये मुस्लिम मुलीचे एका हिंदू मुलासोबत प्रेमसंबंध (Muslim girl affair with Hindu boy) होते. त्यातून लग्नापूर्वी मुलाने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून मारहाण (refusal convert to Islam and beating) केल्याचा (Hindu boy brutally beaten by Muslim girl family ), कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप केला आहे. आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. पाहूयात काय आहे प्रकार... Latest news from Aurangabad, Aurangabad Crime
मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून खोट्या तक्रारी - औरंगाबादेत राहणारा दीपक सोनवणे, बीई मेकॅनिकल इंजिनीअर आहे. 2018 मध्ये त्याच्यासोबत शिकणाऱ्या एका मुस्लिम तरुणीशी त्याची ओळख झाली होती. यातून दोघांचे प्रेम झाले. 2020-21 दरम्यान त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला; मात्र मुलींच्या घरच्यांनी याबाबत मुलाला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातली. मुलाने नकार दिला आणि त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी अतोनात छळ सुरू केल्याचा आरोप या तरुणाने केलाय. त्याला त्याच्या घरातून उचलून नेत दोन दिवस डांबून ठेवले, मुलीच्या वडिलांनी अतोनात मारले. इतकेच नाही तर मुलाच्या कुटुंबीयांचाही अनन्वित छळ केला. मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून खोट्या तक्रारी पोलिसात देऊन आम्हाला जेलमध्ये सुद्धा टाकले असल्याचा आरोप या मुलाने केला आहे.
पैसे उकळले... आतापर्यंत या मुस्लिम कुटुंबीयांनी मुलाकडून 11 लाख रुपये उकळल्याच या मुलाचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर मुस्लिम धर्म स्वीकारन्यावरून बळजबरीने सुंता केल्याचाही आरोप या मुलांना केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार सुद्धा दिली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे यात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप या पीडित मुलाने केला आहे.
भाजप आक्रमक... या संपूर्ण प्रकरणाला गंभीर घेत राजकारण तापले आहे. भाजपचे एक शिष्टमंडळ यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. हा प्रकार गंभीर आहे आणि याच्यावर कारवाईची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली. महत्त्वाचे म्हणजे या शिष्टमंडळात राज्याचे सहकार मंत्री अतुल सावेसुद्धा होते. तर या संपूर्ण प्रकरणात एसीपी दर्जाचा अधिकारी आता चौकशी करत असल्याचे पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे. चौकशीच्या अहवालानंतरच यात काय तथ्य आहे हे सांगता येईल असे पोलिसांनी सांगितले.