ETV Bharat / state

प्रशासनाच्या निषेधासाठी उच्चशिक्षित तरुणांनी केली गटारीची स्वछता - पैठण

नगरपालिका स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने प्रशासनाकडे साफसफाई करण्यासाठी वारंवार विनंती केली. मात्र तरीही स्वच्छता न झाल्याने नगरसेविकेच्या उच्चशिक्षीत सुपुत्रांनी प्रशासनाच्या निषेधासाठी गटारीची स्वछता केली.

तरुणांनी केली गटारीची स्वछता
author img

By

Published : May 8, 2019, 3:21 PM IST

औरंगाबाद - पैठण शहरातील नगरसेविकेच्या उच्चशिक्षीत सुपुत्रांनी प्रशासनाच्या निषेधासाठी गटारीची स्वछता केली. ही अनोखी स्वच्छता मोहीम राबवून नगर परिषद प्रशासनाचा त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

तरुणांनी केली गटारीची स्वछता

पैठण शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत चालला असून नगर परिषद प्रशासनाला सांगुनही प्रभाग 11 मध्ये स्वच्छता होत नाही. त्यामुळे संतप्त नगरसेविका पुष्पा वानोळे यांच्या दोन्हीही मुलांनी खोरे हातात घेऊन तुंबलेल्या नाल्यातील घाण काढून प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवल्या.

नगरसेविकेचा मोठा मुलगा संग्राम वानोळे हा पेशाने वकील असून दुसरा मुलगा सम्राट वानोळे हा उच्चशिक्षित आहे. असे असताना नगर परिषद प्रशासनाचा निषेध करत या दोघांनी प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली. त्यांच्या या मोहीमेचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Intro:पैठण शहरातील प्रभाग ११ च्या नगरसेविकेच्या उच्च शिक्षीत दोन मुलानी  स्वच्छता मोहीम राबवुन नगर परीषद प्रशासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध केला आहे.

Body:

पैठण शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत चालला असुन नगर परीषद प्रशासनाला सांगुन ही प्रभाग ११ मध्ये स्वच्छता होत नसल्याने संतप्त नगरसेविका पुष्पाताई वानोळे यांच्या  दोन्ही ही मुलांनी स्वतः हा खोरे हातात घेऊन तुंबलेल्या नाल्यातील घाण काढुन प्रभागातील नागरीकांच्या अडचणी सोडवल्या.    नगरसेविकेचा मोठा मुलगा संग्राम वानोळे हा पेशाने वकील असुन दुसरा मुलगा सम्राट वानोळे  हा उच्चशिक्षित आहे. असे असतांना नगर परीषद प्रशासनाचा निषेध करत या दोघांनी प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली. त्यांच्या या मोहीमेचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून नगर परीषद प्रशासनाच्या विरोधात नागरीकात संताप व्यक्त केला जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.