औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना प्रचारात उमेदवारांची भाषा खालच्या पातळीवर जात असल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबाद कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेवर खालच्या पातळीवर टीका केली.
लोकसभेत हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केल्यामुळे जिल्ह्यात २० वर्षांपासून फडकत असलेला भगवा उतरला आणि हिरवा आला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या जाहीर सभेत केली होती. यावरून उत्तर देताना हर्षवर्धन पाटील यांचाही तोल सुटल्याचे दिसून आले. जर, मुस्लीम खासदार चालत नव्हता, तर सत्तार काय...xxx अशा अतिशय आक्षेपार्ह भाषेत जाधव यांनी शिवसेनेवर प्रचारसभेत टीका केली.
हेही वाचा - भाजप सरकारमधील लोक काँग्रेससारखे खात नाहीत, त्यांची खान्याची पद्धत वेगळी - प्रकाश आंबेडकर
हर्षवर्धन जाधव यांची प्रचारात पातळी सोडल्याने शिवसेनेत संताप दिसून आला. पराभव दिसून आल्यानेच जाधव यांची भाषा घसरली आहे. शिवसेना त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे प्रत्युत्तर शिवसेना आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी दिले.
हेही वाचा - भाजपला काहीही विचारा, उत्तर एकच 370; शरद पवारांचा भाजपला टोला