छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एन3 एच2 या विषाणू बाबत यंत्रणा सज्ज झाली असताना, कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात अहमद नगर जिल्ह्यात शिक्षण घेत असलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला, त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा विद्यार्थी आधी सहलीला गेला होता. तिकडनं आल्यानंतर तो पुन्हा महाविद्यालयात गेला असतात तो आजारी पडला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात असलेल्या परिवार जणांची आणि मित्रांची तपासणी केली जात असल्याचे, आरोग्य विभागाने सांगितले आहे.
आरोग्य यंत्रणा सज्ज : कोरोणाचा संसर्ग पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं दिसून आलं. औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत आरोग्य केंद्रांवर आणि चाचणी सुरू करण्यात आली आहे. मागील अनुभव पाहता मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत आहेत. काही लक्षण असलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये, पंधरा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यात 13 जण शहरी भागातील तर, दोन जण ग्रामीण भागातील असल्याची माहिती, आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
रुग्णालय सज्ज : देशात विविध भागांमधील कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता महानगरपालिका तर्फे यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. पारस यांनी दोन दिवसापूर्वी खाजगी रुग्णालयांना पत्र काढून लक्षणं असलेल्या प्रत्येक रुग्णाची माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. इतकचं नाही तर आरटीपीसीआर द्वारे घाटीतील लॅब मध्ये कोरोना आणि एच3 एन2 या आजारांची एकाच वेळी चाचणी केली जात आहे. चिकलठाणा परिसरातील मेल्ट्रोन रुग्णालय उपचारासाठी सज्ज करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्य यंत्रणेचे मॉक ड्रिल देखील करण्यात आले. कोरोना रुग्ण रुग्णालयात आल्यावर किती वेळेत त्याला उपचार देणे शक्य आहे? याबाबतची ही चाचणी करण्यात आली. मेल्ट्रोन रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याबाबत तपासणी केली असून, आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज केल्याचं, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेच्या यांनी सांगितलं.