ETV Bharat / state

गुजरातच्या व्यापाऱ्याची औरंगाबादेत दिवसाढवळ्या चाकूने भोसकून हत्या

पटेल हे आज सकाळीच गुजरातहून औरंगाबादेत आले होते. दुपारी दोन मित्रांसह बसलेले असताना अचानक एक हल्लेखोर त्यांच्या फ्लॅटमध्ये आला.  त्याने पटेल यांच्यावर पिस्तूल रोखली. हे पाहून पटेल यांचे दोन्ही मित्र बाथरूममध्ये लपले. त्यानंतर पटेल हे बाहेर पळून जात असतानाच बाहेर उभ्या इतर दोघांनी त्यांना चाकूने भोकसले.

author img

By

Published : Jan 31, 2020, 8:53 PM IST

मृत प्रकाश जसवंत पटेल
मृत प्रकाश जसवंत पटेल

औरंगाबाद - गुजरातमधील व्यपाऱ्याची शहरात दिवसाढवळ्या चाकूने भोकसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकाश जसवंत पटेल, असे हत्या करण्यात आलेल्या व्यापाऱयाचे नाव आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गुजरातच्या व्यापाऱ्याची औरंगाबादेत दिवसाढवळ्या चाकूने भोसकून हत्या

मूळचे गुजरात राज्यातील व्यापारी प्रकाश पटेल यांचे औरंगाबादेतील नगारखाना गल्ली भागात कार्यालय आहे. कार्यालयाच्या बाजूलाच त्यांचे घर आहे. तसेच काही अंतरावर एक तीन खोल्यांचा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये त्यांचे सर्व रोखीचे व्यवहार होत होते. या तिन्ही वास्तू भाड्याने घेतलेल्या आहेत. पटेल हे आज सकाळीच गुजरातहून औरंगाबादेत आले होते. दुपारी दोन मित्रांसह बसलेले असताना अचानक एक हल्लेखोर त्यांच्या फ्लॅटमध्ये आला. त्याने पटेल यांच्यावर पिस्तूल रोखली. हे पाहून पटेल यांचे दोन्ही मित्र बाथरूममध्ये लपले. त्यानंतर पटेल हे बाहेर पळून जात असतानाच बाहेर उभ्या इतर दोघांनी त्यांना चाकूने भोसकले.

रक्तबंबाळ अवस्थेत पटेल हे शेजारील त्यांच्या कार्यालयात गेले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. पटेल यांच्यावर बंदूक रोखल्याची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ते डिव्हीआर पोलिसांनी जप्त केले आहे. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पटेल यांच्या फ्लॅटची झडती घेतली असता तिथे नोटा मोजण्याची मशीन, नोटांच्या बंडलला लावण्यात येणारी चिकटपट्टी, स्टेपलर, असे साहित्य मागील खोलीत आढळून आले आहे. यावरून या ठिकाणी मोठ्या रकमेची मोजणी होत असल्याचा संशय आहे. हा हल्ला हवाला रॅकेटशी संबंधित असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:गुजरात मधील व्यपारी प्रकाश भाई जसवंत भाई पटेल यांची दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेली तीन हल्लेखोरांनी त्यांच्या खोलीत जाऊन चाकूने भोसकून दिवसा ढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी औरंगाबादेतिल नगारखानागल्ली भागात घडली.हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत असून हा हल्ला हवालाच्या आर्थिक देवाणघेवाण वरून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे..

Body:
मूळचे गुजराथ राज्यातील व्यापारी प्रकाश भाई पटेल यांनी औरंगाबादेतील नगारखाना गल्ली भागात एक कार्यालय आहे.कार्यालयाच्या बाजूलाच त्यांचे घर आहे व काही अंतरावर एक अजून तीन खोलीचा फ्लॅट आहे. याच फ्लॅट मध्ये सर्व रोखीचे व्यवहार होत असे. हे तिन्ही किरायाने घेतलेले आहेत.पटेल हे आज सकाळीच गुजराथ येथील औरंगाबादेत आले व दुपारी ते त्यांच्या फ्लॅट मध्ये दोन मित्रासह बसलेले असताना अचानक एक हल्लेखोर त्यांच्या फ्लॅट मध्ये आला व त्याने पटेल यांच्यावर पोस्तूल रोखली हे पाहून पटेल यांचे दोन्ही मित्र फ्लॅट मधील बाथरूम मध्ये लपले.त्या नन्तर पटेल हे बाहेर पळून जात असतानाच बाहेर उभ्या इतर दोघांनी त्यांना चाकूने भोसकले. रक्तबंबाळ अवस्थेत पटेल हे शेजारील त्यांच्या कार्यालयात गेले तेथेच त्यांचा मृत्यू झाला. पटेल यांच्यावर बंदूक रोखल्याची सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.मात्र ते डिव्हीआर पोलिसांनी जप्त केले आहे
या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत.परिसरातील सीसीटीव्ही ची पाहणी केली असता त्यामध्ये तीन तरुण हल्लेखोर हे तोंडाला रुमाल बांधून मोटारसायकल वरून आले असल्याचे स्पष्ठ झाले तिन्ही हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत..

पोलिसांनी जेंव्हा पटेल यांच्या फ्लॅट ची झडती घेतली तेंव्हा नोटा मोजण्याची मोठी मशीन, त्याच बरोबर नोटांच्या बंडलला लावण्यात येणारे चिकटपट्टी, स्टेपलर असे एखाद्या बँकेत असणारे साहित्य मागील खोलीत आढळून आले या वरून या ठिकाणी मोठ्या रकमेची मोजणी होत असल्याचा संशय आहे.हा हल्ला हवाला रॅकेट शी संबंधित असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे..
या हत्ये प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.