औरंगाबाद : औरंगाबादेत चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने चक्क ग्रामपंचायत सदस्यांना पोलिसांविरोधात उपोषण करावा लागल्याचा प्रकार पिसादेवी परिसरात घडला. गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत पोलीस गस्त वाढवण्याची मागणी वारंवार करूनही पोलीस कारवाई होत नसल्याचे पाहून ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला.
चोरीच्या घटना वाढल्या : पिसादेवी परिसर शहराच्या अगदी झपाट्याने वाढणारी नवी वसाहत मानली जाते. जवळपास १५ ते २० हजार नागरिकांची लोकवस्ती असलेल्या या परिसरात चोरांनी दहशत माजवली आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये जवळपास 20 वाहनांची चोरी झाली आहे. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहांचोरांचे सीसीटिव्ही देखील अनेक वेळा समोर आले आहे. त्याबाबत पोलिसांना तक्रार देण्यात आल्या. गस्त वाढवण्याची मागणी ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली. अस असल तरी कुठेही पाऊल उचलण्यात आले नसल्याने, उपोषणाला बसण्याचा निर्णय ग्रामपंचायत सदस्यांनी घेत आपल निवेदन सादर केलं असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य मदन काळे यांनी दिली.
चोर सीसीटिव्हीत कैद : गेल्या काही दिवसात होत असलेल्या वाहन चोरीच्या घटना सीसीटीव्ही कैद झाले आहेत. काही दिवसांपूर्वी चोरांनी बुलेट गाडी चोरण्याचा प्रयत्न केला. जवळपास एक तास तिथे उभे असलेल्या वाहनांचे लॉक तोडण्याचा प्रयत्न चोरानी केला. बुलेटचे गाडीचे हँडल लॉक त्याने तोडले होते, मात्र कोणीतरी येईल या भीतीने चोर तिथे निघून गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा झाली. तर एका कॅमेरात पल्सर गाडी चोरून नेतानाचे दृश्य कैद झाले आहे. मात्र त्या गाडीचे पेट्रोल लॉक न उघडल्याने चोराला पल्सर गाडी जास्त दूर नेता आली नाही. त्याने ती गाडी रस्त्यातच सोडून पळ काढला. त्यामुळे एक वाहन रस्त्यात आढळून आले असले तरी, इतर वाहनांचा मात्र सुगावा अद्याप लागलेला नाही.
स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी : होणाऱ्या या घटनामुळे उपोषणकर्त्यांनी परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी उभारावी आणि पोलीस गस्त वाढवावी अशा मागण्या केल्या आहेत. त्यावर पोलिसांनी लवकरच कारवाई करू असे आश्वासन देत, परिसरात असणाऱ्या प्रत्येक कॉलनीत नागरिकांसोबत बैठक घेऊन योग्य त्या सूचना देऊ असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र आम्हाला संरक्षण द्या अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मदन काळे, सरपंच राजेश काळे, उपसरपंच शेख सत्तार, ताराचंद काळे, वैराळे, अमोल काळे या ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील देविदास काळे, शिवाजी पखे, अरुण काळे यांच्यासह नागरिकांनी केली.
हेही वाचा : Mumbai News: मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय; प्रदूषणामुळे 5 वर्षात तब्बल ६ हजार ७५७ मुंबईकरांचा मृत्यू