औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा मंगळवार आज पासून (१६ मार्च) सुरू झाल्या आहे. यासाठी २१२ परीक्षा केंद्रावर १ लाख २७ हजार ७८७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यापीठाने ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय दिले आहेत. ऑफलाइन परीक्षा देणार्यांसाठी 'होम सेंटर' आहे, तर ऑनलाइन परीक्षा मोबाइल, लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे दिली जात आहे. परीक्षा केंद्रांवर 'कोविड'संदर्भात योग्य काळजी घेऊन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपासून पदवी परीक्षेला सुरुवात.. ऑनलाइनला तांत्रिक अडचणी.. ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना लॉगिनसाठी तांत्रिक अडचणी असल्याचे काही ठिकाणी दिसून आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधला असता अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यासाठी विलंब झाला. या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
तालुकानिहाय परीक्षा नियंत्रण पथक स्थापन.. विद्यापीठ कार्यक्षेत्रात ३६ तालुक्यांसाठी प्रत्येकी तीन प्राध्यापकांचे परीक्षा नियंत्रण पथक स्थापन केले आहे. हे पथक कोविडच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी, केंद्र घेत असलेली खबरदारी, रजिस्टरवरील नोंद, आयटी कोऑर्डिनेटर, सीसीटीव्ही कार्यरत आहे का, याची तपासणी करत आहे.हेही वाचा - 'वाझे प्रकरणाची चौकशी करण्याआधी कोणालाही दोषी ठरवले जाऊ नये'