ETV Bharat / state

छेड काढणाऱ्या तरुणांना तरुणीने शिकवला धडा; औरंगाबादमधील घटना - pundliknagar police station

पीडिता आणि आरोपी एकाच गल्लीत राहतात. रविवारी रात्री ती दुचाकीवरून जात असताना गल्लीतील तरुण त्याच्या दोन साथीदारांसह तिच्या मागावर असल्याचे दिसले. तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. काही अंतरावर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ती तिच्या दुकानाकडे जात असताना, आरोपीने तिच्या गाडीसमोर स्वतःची दुचाकी आडवी लावली.

girl given lession to some roadromio over ragging in aurangabad
छेड काढणाऱ्या तरुणांना तरुणीने शिकवला धडा
author img

By

Published : Feb 10, 2021, 3:44 PM IST

Updated : Feb 10, 2021, 4:17 PM IST

औरंगाबाद - गल्लीत राहणाऱ्या रोडरोमियोला दुचाकीवर पाठलाग करून छेड काढल्यामुळे तरुणीने चांगलाच हिसका दाखवला. तरुणीने त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली.आईला बोलावून घेत माफी मागत नाही तोवर सोडले नाही. या घटनेदरम्यान, बराच वेळ शिवाजीनगर रस्त्यावर रोडरोमियोंनी गोंधळ घातला. तर मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे.

काय आहे घटना?

पीडिता आणि आरोपी एकाच गल्लीत राहतात. रविवारी रात्री ती दुचाकीवरून जात असताना गल्लीतील तरुण त्याच्या दोन साथीदारांसह तिच्या मागावर असल्याचे दिसले. तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. काही अंतरावर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ती तिच्या दुकानाकडे जात असताना, आरोपीने तिच्या गाडीसमोर स्वतःची दुचाकी आडवी लावली. तिने त्याला दुचाकी काढण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी दुचाकी तर काढली नाहीच, उलट तिलाच तो आणि त्याचे दोन मित्र शिवीगाळ करीत होते.

हेही वाचा - दिसशील तिथे फटके खाशील; खासदार विनायक राऊतांना निलेश राणेंचा धमकीवजा इशारा

माफी माग तरच चावी मिळेल -

तिने थेट त्याच्या दुचाकीची चावी काढली. यानंतर ती दुकानात गेली. तिच्यापाठोपाठ तो मित्रांसह तेथे आला. त्याने चावी मागितली. मात्र, तिने माफी माग, तरच चावी मिळेल, असे बजावले, तो माफी मागायला तयार नव्हता. उलट तिला आणि तिच्या आईकडे उंगली निर्देश करीत शिव्या देऊ लागला. यामुळे तिथे बघ्यांची गर्दी जमली. काहींनी मुलीलाच समजावून त्याला चावी घेऊन टाक, असेही सांगितले. तिने मात्र, जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत चाबी मिळणार नाही, असे सांगितले. शिवाजीनगर रस्त्यावर गर्दी झाल्याचे कळताच, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलाला ठाण्यात आणले. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Feb 10, 2021, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.