ETV Bharat / state

औरंगाबादेत मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेला गेली तरुणी, १५ मिनिटांत झाला मृत्यू, डॉक्टर फरार - girl

हेमा अशी काशी बेशुद्ध पडली अशी शंका आई वडिलांनी डॉक्टरांकडे उपस्थित केली. बराच वेळ ती शुद्धीवर येत नसल्याने शेवटी घाटी रुग्णालयात तिला हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून हेमाला मृत घोषित केले.

चुकीच्या उपचाराने तरुणीचा मृत्यू; डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल.
author img

By

Published : Jun 1, 2019, 2:04 PM IST

Updated : Jun 1, 2019, 2:23 PM IST

औरंगाबाद - मुळव्याधच्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या 22 वर्षीय तरुणीवर चुकीचा उपचार केल्याने तीचा मृत्यू झाला आहे. ती बी.फार्मसीचे शिक्षण घेत होती. ही घटना शहरातील मुकुंदवाडी भागात घडली. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. हेमा अनिल वाघमारे (वय 22 रा. इंदिरानगर, मुकुंदवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मृत हेमाला मागील महिनाभरापासून मूळव्याधीचा त्रास होत होता, त्यामुळे तिचा मुकुंदवाडी येथील सुखायू सुश्रुत रुग्णालयात डॉक्टर शिवकुमार गोरे यांच्याकडे उपचार सुरू होते. या रुग्णालयात कमी किमतीत उपचार करण्यासाठी एक शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्या शिबिराचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. हेमा शुक्रवारी दुपारी उपचारासाठी गोरे यांच्याकडे रुग्णालयात गेली होती. तेथे गोरे यांनी हेमाला कमी किमतीचे आमिष दाखवत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी हेमा तयार झाली व तिला संध्याकाळी 6 वाजेची वेळ देण्यात आली. संध्याकाळी साडेसहावाजता डॉक्टरांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले व 15 मिनिटांत तिला बेशुद्धावस्थेत ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर बीपी लो झाल्याचे सांगत डॉक्टर गोरे तेथून निघून गेले.

त्यानंतर हेमा अशी काशी बेशुद्ध पडली अशी शंका आई वडिलांनी डॉक्टरांकडे उपस्थित केली. बराच वेळ ती शुद्धीवर येत नसल्याने शेवटी घाटी रुग्णालयात तिला हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून हेमाला मृत घोषित केले.

याप्रकरणी हेमाचे वडील अनिल वाघमारे यांच्या तक्रारीवरून डॉक्टर गोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, जोपर्यंत आरोपी गोरेला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका हेमाच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

Intro:मुळव्याध च्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेली तरुणीवर चुकीचे उपचार केल्याने 22 वर्षीय बी.फार्मसीच्या विद्यर्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना मुकुंदवाडी भागात घडली. या प्रकरणी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र जो पर्यंत आरोपी अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
हेमा अनिल वाघमारे वय-22 (रा.इंदिरानगर, मुकुंदवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे.

Body:मृत हेमाला मागील महिनाभरापासून मूळव्याधीचा त्रास होत होता, त्यामुळे तिचा मुकुंदवाडी येथील सुखायु सुश्रुत या रुग्णालयात डॉक्टर शिवकुमार गोरे यांच्याकडे उपचार सुरू होते. या रुग्णालयात कमी किमतीत उपचार करण्यासाठी एक शिबीर आयोजित करण्यात आले होते त्या शिबिराचा कालचा शेवटचा दिवस होता.दरम्यान काल दुपारी हेमा उपचारासाठी गोरे यांच्या कडे रुग्णालयात गेली असता गोरे यांनी हेमाला कमी किमतीचे अमिश दाखवत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी हेमा तयार झाली तिला संध्याकाळी 6 वाजेची वेळ देण्यात आली. संध्याकाळी साडेसहावाजत डॉक्टरांनी तिला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले व 15 मिनिटांत तिला बेशुद्धावस्थेत ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आणण्यात आले व बी.पी. लो झाल्याचे सांगत डॉक्टर गोरे तेथून निघून गेले. सर्वांना बोलून आत मध्ये गेलेली हेमा अशी काशी बेशुद्ध पडली अशी शँका आई वडिलांच्या डॉक्टरांकडे उपस्थित केली. बराच वेळ ती शुद्धीवर येत नसल्याने शेवटी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासून हेमाला मृत घोषित केले.या प्रकरणी हेमाचे वडील अनिल वाघमारे यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर गोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच आरोपी डॉक्टर फरार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे.मात्र जो पर्यंत आरोपी गोरे अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अश्या भूमिकेवर नातेवाईक ठाम आहेत.Conclusion:
Last Updated : Jun 1, 2019, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.