छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात राहणाऱ्या चौदा वर्षीय मुलीवर तिच्याच परिचित मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार सातारा पोलिसात देण्यात आली. ब्लॅकमेल करून अत्याचार होत असल्याची माहिती मुलीने घरी देण्याचा प्रयत्न केल्यावर कुटुंबीयांनी साथ दिली नसल्याने ती घर सोडून निघून गेली. त्यावेळी रेल्वे पोलिसांना सापडली. त्यावेळी घरच्यांनी तिला ताब्यात घेण्यास नकार दिल्याने मुलीला सामाजिक संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनतर सहा महिन्यांनी मुलीच्या वडिलांनी हिंमत करून पोलिसात तक्रार दिली. आधी मुलीची बदनामी होईल, विचार करा असे पोलिसांनी सांगितले. मात्र, वडील तक्रारीबाबत ठाम राहिल्याने पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करत, चार जणांना ताब्यात घेतले.
ब्लॅकमेल करत केला अत्याचार : चौदा वर्षीय मुलीने वाईट संगत असलेल्या मुलांशी संपर्क आला. त्यांनी तिच्यासोबत मैत्री केली. काही दिवसांनी त्यांनी त्याचा गैरफायदा घेत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. त्याच्या फायदा घेत अनेक वेळा त्यांनी रात्री बेरात्री घराबाहेर बोलवून वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करू लागले. ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 दरम्यान या काळात वेगवेगळ्या ठिकाणी, कधी दोघे तर कधी तिघे एकत्र येऊन सामूहिक अत्याचार करू लागले. सतत वाढलेल्या अत्याचाराला कंटाळून मुलीने घरी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कुटुंबीयांना याबाबत धक्का बसला त्यांनी तिला साथ न दिल्याने तिने घर सोडले.
चार जणांना अटक, दोघे फरार : सहा महिन्यांचा काळ लोटल्यानंतर मुलीच्या वडिलांनी आपली तक्रार सातारा पोलिसात दिली. आरोपींविरुद्ध सातारा परिसर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत दिलेल्या नावांमध्ये असलेल्या सहापैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दोन आरोपी फरार झाले. किशोर चव्हाण, अक्षय चव्हाण, असीम पठाण, राम गायकवाड अशी सहापैकी चार आरोपींची नावे आहेत, तर यात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. आरोपींची संख्या वाढू शकते, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा :
- Rape Of Two Minor Girls : अनाथ मुलींना दत्तक घेऊन ६ वर्षे अत्याचार, अनोळखी व्यक्तीच्या तक्रारीनंतर चाईल्डलाईनकडून सुटका
- Bilaspur Crime News : महिलेवर चिमुरडीच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप, हिंदू संघटनांनी विरोध करत पोलिस ठाण्याला घातला घेराव
- Rape Of Two Minor Girls : अनाथ मुलींना दत्तक घेऊन ६ वर्षे अत्याचार, अनोळखी व्यक्तीच्या तक्रारीनंतर चाईल्डलाईनकडून सुटका