औरंगाबाद- जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या निधीतून ७ कोटी ८६ लाखाच्या यंत्रसामग्री खरेदीला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये घाटी रुग्णालयात ३८ प्रकारातील ६४ तर महाविद्यालयात १२ प्रकारच्या ३८ यंत्रांचा समावेश आहे. घाटीत नवीन यंत्रे सामील होत असल्याने आता रुग्णांची हेळसांड काही प्रमाणात का होईना थांबणार आहे.
जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडून २०१९-२० या आर्थिक वर्षात १० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एका अद्यादेशात ७ कोटी ६२ लाखाची यंत्रे घाटी रुग्णालयासाठी मंजूर झाली आहे. यात अत्याधुनिक यंत्र, एच. डी लेप्रोस्कोपी, व्हिडीओ कोलोनोस्कोप, सोनोग्राफी मशीन इंटेसिव्ह व्हेंटिलेटर, स्लीट लॅम्प डिजिटल इमेजिंग सिस्टीम, एकसीमर लेझर सिस्टीम, १०० एम एक्सरे मशीन, निओटल हायब्रीड व्हेंटीलेटर, अम्ब्युलेटरी बीपी मॉनिटर यासह निदानात महत्वाच्या असलेल्या यंत्र सामग्रीचा समावेश आहे. या यंत्रांच्या समावेशाने रुग्णांची तासनतास होणारी होरपळ आता काही प्रमाणात का होईना थांबणार आहे.
हेही वाचा- औरंगाबाद पालिकेच्या स्थायी समीतीची सोमवारी सभा; विधानसभेच्या तोंडावर विविध प्रस्ताव मंजुरीची शक्यता